सेलू तालूक्यातील गावात बिबट्याचा वावर.
राधे धामणगाव,हिस्सी,लाड नांदरा,देऊळगाव गात,पिंपरी आणि आता दिग्रस जहांगीर या गावात वावर.
नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

Jyotsna Wankhede:पाथरी तालूक्यातील रेणाखळी येथे नोव्हेंबर महिन्यात दोन जनावरांचा फडशा पाडल्यानंतर बिबट्या पाथरी तालूक्यातील रेणाखळी लगत सेलू तालूक्यातील राधे धामण गाव,लाड नांदरा,हिस्सी, देऊळ गाव गात आणि आता दिग्रस जहांगीर येथे बिबट्या चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या मुळे परिसरात बिबट्याचा रहिवास असल्याची चर्चा सुरू झाली असून असून नागरीकांनी सतर्क राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे.पाथरी तालूक्यातील रेणाखळी येथे दोन गायींचा बिबट्याने फडशा पाडला होता.बिबट्याच्या पायाचे ठस्से असल्याचा वनविभागाकडून दूजोरा मिळाला असून हा बिबट्या पाथरी तालूक्यातील रेणाखळी लगत सेलू तालूक्याती ल गावात आल्याचा दूजोरा वनविभागाकडून देण्यात आला आहे.शेतकरी अगोदरच वन्य प्राण्यामूळे त्रस्त झाले असून त्यामध्ये तालूक्यातील गावांच्या शेतशिवारात बिबट्याचा रहिवास असल्याच्या बातमीमूळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या शेतात पिकांना पाणी देण्यासह कापूस वेचणी, हरभरा खूरपणी सह इतरही कामे शेतकरी करत असतांना शेतात जावे की नाही हि भिती निर्माण झाली आहे. वनविभागा कडून बिबट्या बंदोबस्त करण्या साठी रेणाखळी शिवारात ट्रेप लावण्यात आला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.तर प्रशासनाकडून शेतात असतांना नागरीकांनी दक्षता घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
दिग्रस जहांगीर येथे बिबट्या आढळून आल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण वन विभागाने त्याची पुष्टी केली नाही.