Jyotsna Wankhede:
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद दिनांक 13 डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथील यशवंत स्टेडियम मध्ये विधिमंडळ अधिवेशनात भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होत्या.
या आंदोलनाचे नेतृत्व मान. राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू, माजी विधान परिषद आमदार नागो गाणार व माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनातील एकूण 22 मागणीचे निवेदन मान. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना देण्यात आले.
आंदोलनातील मागणी अशैक्षणिक शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 रद्द करा, टीईटी पात्रता परीक्षा रद्द करा,1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित करणारा वित्त विभागाचा शासन निर्णय 31 ऑक्टोबर 2005 व शिक्षण विभागाचा शासन निर्णय 29 नोव्हेंबर 2010 रद्द करा, सर्व प्रकारच्या शाळांना देय वेतन अनुदानावर आधारित वेतनेत्तर अनुदान देण्यात यावे,
राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून फक्त अध्यापनाचे काम करू द्या, सहशालेय उपक्रमांची माहिती संगणकाद्वारे पाठविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करा, विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढीव दराने द्या.विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढीव दराने द्या. शिक्षकांना 10 20 30 आश्वासित प्रगती योजना लागू करा, राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करा,
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे पुनरस्थापित करा, राज्यातील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजा घोषित करा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी बाल वाटिका स्तरातील वयोगट तीन ते सहा शिक्षणाला कायदेशीर शैक्षणिक दर्जा द्यावा, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करा सर्व इंग्रजी माध्यमातील शाळांना शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एम. इ. पी. एस. 1981 नुसार सेवाशर्ती लागू करणे, रात्र शाळेचे मान्यतेचे निकष पूर्ववत करणे व रात्र शाळेतील दुपार कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन वेतनासाठी आयुक्तांनी तातडीने व्यवस्था करावी, सरल आणि यु-डायस मधील वयाची शिथीलता असावी,दरवर्षी नवीन टॅब उपलब्ध करून द्यावा, सर्व माध्यमिक शाळेत आवश्यकतेनुसार पुरुष किंवा स्त्री सेवक शासकीय वेतनावर आयुक्तांनी तातडीने नेमण्यात यावी, सेवा जेष्ठता अंमलबजावणी बाबतीत एक वाक्यता यावी,
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत असलेल्या व्यवसायिक कर्मचाऱ्यांचे प्रश्न संदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी वरिष्ठ वेतन श्रेणी मधील तसेच वेतन निश्चिती मधील श्रेणी काढून अनामत रक्कम वसूल करण्याचे आदेश त्वरित स्थगित करणे, व सेवानिवृत्तीच्या वेळी ज्या कर्मचाऱ्यांच्या अनामत रक्कम वसूल करण्यात आली आहे ती त्यांना परत मिळण्याबाबत.
अशा व अनेक मागण्या शासनाला शिस्तमंडळाने दिल्या यावेळी राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, राज्याचे कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, संघटन मंत्री किरण भावठाणकर, महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, कार्यालय मंत्री निरंजन गिरी, हेदेखील उपस्थित होते.
धरणे आंदोलनाची जबाबदारी संपूर्ण नागपूर विभागांनी स्वीकारून यशस्वी केले. अजय वानखेडे, सुभाष गोतमारे, संतोष सुरावर, रामदास गिरटकर, मधुकर मुप्पीडवार, विलास खोंड,विठ्ठल राजुरकर, धनंजय बोरकर, संध्याताई गिरडकर, गजानन शेळके, विवेक आंबेकर,पुंडलिक,देठे सर,विनोद हुलके,गणेश वाघमारे,सुनिल पाचखेडे,झोडे सर, वाकडे सर,नाकाडे सर, मनीषा साळवे, रंजना कावळे, हेमंत बेलखोडे, प्रशांत वैद्य, अशोक वैद्य, गुणेश्वर कुंडे, ललिता हलमारे, रत्ना चौधरी, वनिता एलावार, शारदा श्रीरामे, तुलाराम मेश्राम, सोपान घुले, दीपक ढगे, सुरेश रोठे, सुभाष घोरपडे, घनश्याम मनबटूलवार, स्नेहल नागरे, मीनानाथ सातपुते, राजू तांदुरकर, चंद्रकांत चौधरी, मुकेश भांगे, भाग्यश्री नकाते, सतीश कचरे, अतुल टेकाडे, गुणवंत अवचितकर, वसंत हिवसे, ज्योती बोकडे, सुधीर राठोड, प्रदीप छलके, गोपाल सोनी, शुभांगी चिकटे, अंगेश बेहलपाडे, राजेश निंबरते, राधेश्याम धोटे, सेवकराम कुथे, स्नेहलता खानापूरकर, मधुकर चौधरी, मुरलीधर करंडे, उर्मिला रहांगडले, सुनिल पाचखेडे, महेशकुमार तुमपल्लीवार, मान. पठाण, व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.