Wednesday, September 2, 2026
spot_img
HomeParbhaniसेलू तालूक्यातील गावामध्ये बिबट्याची दहशत. निपाणी टाकळी शिवारात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू....

सेलू तालूक्यातील गावामध्ये बिबट्याची दहशत. निपाणी टाकळी शिवारात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू. शेतकऱ्यांमध्ये घबराटीची वातावरण.

सेलू तालूक्यातील गावामध्ये बिबट्याची दहशत. निपाणी टाकळी शिवारात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू. शेतकऱ्यांमध्ये घबराटीची वातावरण.

वनविभागा कडून ट्रॅक कॅमेरा बसविण्यात येणार.

नागरीकांनी सतर्क राहण्याचे अवाहन.

Jyotsna Wankhede:पाथरी तालूक्यातील रेणाखळी येथे नोव्हेंबर महिन्यात दोन जनावरांचा फडशा पाडल्यानंतर बिबट्या पाथरी तालूक्यातील रेणाखळी लगत सेलू तालूक्यातील राधे धामण गाव,लाड नांदरा,हिस्सी, देऊळ गाव गात, दिग्रस जहांगीर आणि आता निपाणी टाकळी परिसरात अश्या अनेक ठिकाणी बिबट्या दिसत असल्याची चर्चा शेतकऱ्यांकडून होत असल्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.मागील चार पाच दिवसांपासून बिबट्याचा रहिवास आज या गावी तर उद्या या गावी दिसत असल्याची तोंडी माहिती आणि चर्चा सर्वत्र सुरु झाली असून तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील शेतकरी, शेतमजूर यांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्या मुळे शेतात काम करण्यासाठी कोणी यायला तयार नाही. त्यामुळे शेतातील सर्व कामे खोळंबली आहेत.मागील दोन दिवसांपासून वनविभागाकडून बिबट्याची चाचपणी करण्यात येत असून वनविभागाचे अंकुश जाधव हे प्रत्येक खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना प्रत्यक्ष भेटून बिबट्या आढळून आल्यास कोणती काळजी घ्यावी काय करावे या विषयी माहिती देण्याचे कार्य करत आहेत.नागरीकांनी सतर्क राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे. सेलू तालूक्यातील शेतकरी अगोदरच वन्य प्राण्यामूळे त्रस्त झाले असून त्यामध्ये तालूक्यातील गावांच्या शेतशिवारात बिबट्याचा रहिवास असल्याच्या बातमीमूळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या शेतात पिकांना पाणी देण्यासह कापूस वेचणी, हरभरा खूरपणी सह इतरही कामे शेतकरी करत असतांना शेतात जावे की नाही हि भिती निर्माण झाली आहे. वनविभागा कडून शेतात पाणी देण्यासाठी जाताना एकटे न जाता समूहाने जावे. सोबत बॅटरी,काठी ठेवावी.बिबट्या बंदोबस्त करण्या साठी वनविभागाकडून ट्रेप लावण्यात आला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.तर प्रशासनाकडून शेतात असतांना नागरीकांनी दक्षता घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page