Sunday, September 20, 2026
spot_img
HomeParbhaniसाने गुरुजी कथाकथन तालुका स्तरीय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

साने गुरुजी कथाकथन तालुका स्तरीय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

साने गुरुजी कथाकथन तालुका स्तरीय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

Jyotsna Wankhede: नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सत्यनारायणजी लोया, प्रमुख पाहुणे मकरंद दिग्रसकर, दत्तराव पावडे,राजेश गुप्ता, प्रशालेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे ,ज्येष्ठ शिक्षक जाधव एकनाथ या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून संजय विटेकर, प्रमोद देशमुख आदी व्यासपीठावर विराजमान होते.कार्यक्रमाची सुरुवात उल्हास पांडे सर यांनी खरा तो एकची धर्म या प्रार्थना गीताने केली.स्पर्धा प्राथमिक शाळे करिता घेण्यात आली. स्पर्धे करिता उस्फूर्त शाळांचा सहभाग लाभला.. प्रथम क्रमांक (श्री. के.बा विद्यालय, सेलू ) कु. अवंतिका अक्षय जोशी हिने 1001 चे रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह, दुसरा क्रमांक- कु.सोळंके शरयू लक्ष्मण (नूतन प्राथमिक शाळा,सेलू) हिने 751 रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक कु. मनस्वी मंगेश महाजन (पोद्दार लर्न स्कूल)हिने 501 व स्मृतिचिन्ह पटकावले.. उत्तेजनात पारितोषिक चि. फटाले श्लोक लक्ष्मीकांत, (बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल,सेलू) यास 201 रुपयाचे रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह, दुसरे उत्तेजनार्थ( शांताबाई नखाते प्राथमिक आश्रम शाळा, वालूर) कु. प्रेक्षा बाबुराव साबणे हीच 201 रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सर्व विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे कौतुक अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कुबरे सोनाली यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश काळे यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक पांडे सर, ज्येष्ठ शिक्षक जाधव सर, सावरगावकर सर,पानझाडे सर,महामुनी सर, गोरे सर,खाटीकमारे सर, हळणे सर,डुकरे सर,सौ.चौधरी मॅडम, सौ. डोळस मॅडम, सौ.कुंभार मॅडम, सौ. गजमल मॅडम व शाळेतील सर्व सहकारी मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page