Tuesday, May 5, 2026
HomeParbhani“अराउंड द ग्लोब” थीमवर प्रिन्स इंग्लिश स्कूलचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम.
spot_img

“अराउंड द ग्लोब” थीमवर प्रिन्स इंग्लिश स्कूलचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम.

“अराउंड द ग्लोब” थीमवर प्रिन्स इंग्लिश स्कूलचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम.

गुणवत्तापूर्ण शिक्षणातून घडतो जागतिक विद्यार्थी – डॉ. संजय रोडगे.

Jyotsna Wankhede: श्रीराम प्रतिष्ठान, सेलू आयोजित सुरभी महोत्सव २०२५ अंतर्गत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू यांचा “अराउंड द ग्लोब” या संकल्पनेवर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम दि. २७ डिसेंबर, शनिवार रोजी सॅनरो नॉलेज सिटी, रवळगाव रोड, सेलू येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.जगातील विविध देशांची संस्कृती, परंपरा, नृत्यशैली व वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगतदार नृत्याविष्कारां तून प्रभावीपणे उलगडून दाखविण्यात आली. भारत, स्पेन, जपान, चीन, आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, ब्राझील, अमेरिका आदी देशांच्या सांस्कृतिक नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सुसूत्रता व सादरीकरणातील वैविध्य विशेष लक्षवेधी ठरले.कार्यक्रमात बोलताना श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे अध्यक्ष व कार्यक्रमाध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड, डॉ. होमी भाभा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान सेमिनार व विज्ञान प्रदर्शनांमध्ये मिळवलेले यश हे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून जागतिक स्तरावर सक्षम विद्यार्थी घडविण्याचा शाळेचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी मंचावर संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, शाळेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलूचे संचालक अ‍ॅड. दत्ताराव कदम, अनिल पवार, अजय डासाळकर, केशव सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा डॉ. ऋतुराज साडेगावकर, शहराध्यक्ष भाजपा अशोक शेलार, महिला तालुका अध्यक्ष भाजपा सारिका पारवे, मोहन बोराडे (दैनिक लोकमत), शिवाजी शिंदे (दैनिक एकजूट), प्रफुल्ल विनायके, डॉ. अशोक नाईक, नवरे, विशाल काला, संजय परतानी, कृष्णा काटे, सुयश पटवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगती क्षीरसागर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन कल्पना भाबट यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला यांनी केले.यावेळी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. दत्ताराव कदम यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध वातावरण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीबाबत मनःपूर्वक कौतुक केले.या कार्यक्रमात प्रिन्स ऑफ द स्कूल म्हणून दहावीतील विद्यार्थी उज्ज्वल नारायण निकम व प्रिन्सेस ऑफ द स्कूल म्हणून तनिष्का अनंत तेलभरे यांची निवड करण्यात आली. हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी सेलू, मंठा, पाथरी, मानवत व जिंतूर तालुक्यातील पालकवर्ग व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण परिसर आनंदोत्सवाच्या वातावरणात न्हाऊन निघाला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page