Saturday, May 2, 2026
HomeEducationKGN पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात...
spot_img

KGN पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

KGN पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Jyotsna Wankhede:
बल्लारपूर येथील KGN पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक आसीफ महमूद होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा व नवनिर्वाचित नगरसेविका छाया मडावी तसेच नगरसेवक एडवोकेट पवन मेश्राम उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या प्राचार्या स्वाती वाघमारे, उपप्राचार्या सीमा माकडे, श्वेता डोनेवार तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता.
विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून त्यांच्या कार्याचा आदर्श मांडला. प्रमुख अतिथींनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समाजसुधारणा व स्त्री शिक्षणावरील कार्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला वेलपुरी व मोहिनी काकड यांनी केले. कार्यक्रम प्रेरणादायी संदेशाने संपन्न झाला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page