Saturday, March 14, 2026
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा 

ज्योत्स्ना वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी झेंडावंदनाचा कार्यक्रम मान. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांच्या हस्ते पार पडला. त्यांना स्काऊट गाईड शिक्षक एस. एम. चव्हाण यांनी मानवंदना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. भगत  मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, यु. के. रांगणकर सर, प्रमुख उपस्थिती शालिक किरमे, सुभाष पेटकर यांची होती.
प्रथमत: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संविधान वाचन, महाराष्ट्र गीत, दहावी परीक्षेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.
शाळेची विद्यार्थिनी रूपाली निमकर हिने सांगितले की, संविधान हा भारताचा कणा आहे. विद्यार्थी अथर्व हीकरे याने ‘ मेरे वतन के लोगो ‘ हे गीत गायन केले.
प्रमुख पाहुणे रांगणकर सर यांनी सांगितले की, विद्यार्थी दशेपासून लोकशाही मूल्ये रुजविणे आवश्यक आहे.
एम. डी. टोंगे यांनी सांगितले की, आपण संविधानानुसार कार्य करू लागलो.
आर. बी. अलाम यांनी कथन केले की, आपली व्यवस्था भारतीय संविधानानुसार चालते.
अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, भारतीय संविधान स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय चतु:सूत्रीवर आधारित आहे. त्याचनुसार भारतीय राज्यकारभार चालविला जातो. आपण आपले कर्तव्य विसरता कामा नये. आपण आपले काम परिपूर्ण पद्धतीने करत गेले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यात काही ना काही क्षमता असतात त्याचा वापर त्याने आपला विकास करण्यासाठी केला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन आर. बी. अलाम आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आर. के. वानखेडे सेवानिवृत्त शिक्षक, किशोर काळे, गणेश चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले, विजय कोंगरे सहित विद्यार्थी वृंद उपस्थित होते.
शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
36 attachment  •  Scanned by Gmail

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page