Monday, September 14, 2026
spot_img
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Jyotsna Wankhede:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत वर्ग नववीच्या विद्यार्थ्यातर्फे, वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, आर. के. वानखेडे सेवानिवृत्त शिक्षक तसेच प्रमुख उपस्थिती आर. बी. अलाम, एस. एन. लोधे मॅडम यांची होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मंचावर मंचावर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. दहावीचे विद्यार्थी कार्तिक सोनुले, यश माणूसमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आर. बी. अलाम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यापाशी ज्ञान असल्यामुळे पास होतो, त्यासाठी सराव करणे आवश्यक आहे.
एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी कथन करताना सांगितले की, मार्क मिळवण्यासाठी चांगले पेपर सोडवणे आवश्यक आहे.
एस. एन. लोधे मॅडम यांनी सांगितले की, आधी नियमावली वाचायची आणि नंतर न घाबरता पेपर सोडवायचे आहे. आधी सोपे प्रश्न सोडवण्याचे काम करावे.
आर. के. वानखेडे यांनी कथन केले की, चांगल्या पदावर जाण्यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.
एस. एम. चव्हाण यांनी सांगितले की, आज आपल्याला आपुलकीने निरोप देण्यात येत आहे. योग्य मार्गाने जाऊन यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा.
अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी कथन केले की, येणाऱ्या
परीक्षेसाठी आपल्याला योग्य ती तयारी करणे आवश्यक आहे. आपल्याला निश्चित यश प्राप्त होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदी गवई, संचालन त्रिशाली महानंद व आभार प्रदर्शन सिया देवगडे यांनी केले.
कार्यक्रमात वर्ग नववीचे वर्गशिक्षक यु. के. रांगणकर, शिक्षकेतर कर्मचारी गणेश चंदावार, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, वामन बोबडे, इंद्रभान अडबाले सहित वर्ग नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page