वरोरा तिरळे कुणबी समाजातर्फे जाहीर सत्कार
ज्योत्स्ना वानखेडे:
वरोरा तिरळे कुणबी समाजातर्फे समाजातील राजकीय सामाजिक सेवा करणा-यांचा राजकीय क्षेत्रात सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित रविवार, दि. ०१ मार्च २०२६ रोजी, आशिर्वाद मंगल कार्यालय, वरोरा येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी नरेंद्र ठाकरे, प्रमुख उपस्थितीत प्रविण देशमुख, शिव चारित्र्यावर व्याख्यान दिली. तसेच रविंद्र शिंदे मध्यवर्ती बॅंक चंद्रपूर, संगिता खांडेकर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर, अर्चना ठाकरे वरोराच्या नगराध्यक्ष, सुधीर पांगुळ वर्धेचे नगराध्यक्ष, सिमा पवार नगरसेविका भद्रावती, संदिप वडाळकर भद्रावती नगरसेविका, संतोष पवार वरोरा नगरसेवक, योगिता नेरकर उपाध्यक्ष नगर परिषद वरोरा व अन्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगीरी करणा-या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जयंत ठाकरे, नरेंद्र भोयर, शरद भोयर व असंख्य पदाधिक-यांनी परिश्रम घेतले.