Thursday, July 16, 2026
HomeEducationचंद्रपूर जिल्ह्यातील कोचिंग क्लास मध्ये भोंगळ कारभार
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यातील कोचिंग क्लास मध्ये भोंगळ कारभार

चंद्रपूर जिल्ह्यातील कोचिंग क्लास मध्ये भोंगळ कारभार 

विद्यार्थी शिकतात एकीकडे आणि ऑनलाईन अटेंडन्स लागते दुसरीकडे 

महाविद्यालयासोबत कोचिंग क्लास  वाल्यांचे  संगनमत

शिक्षण विभाग गाढ झोपेत 

चंद्रपूर जिल्ह्यात चालत असलेल्या कोचिंग क्लास मध्ये भोंगळ कारभार समोर आला असून, विद्यार्थी एकीकडे शिकताना दिसतात व त्यांची ऑनलाईन अटेंडंट संबंधित  महाविद्यालयात लावल्या जात असल्याचे चर्चिले जात आहे.
कोचिंग क्लास मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात सोबत टायप असल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्यांची निवासी सुविधा कोचिंग सेंटर मध्ये उपलब्ध आहे. ते 24 तास तेथेच असतात. त्यांची ऑनलाईन अटेंडन्स संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्याच्या अनुमतीने संबंधित वर्गशिक्षक लावत असतो, याच्यामध्ये शिक्षण विभाग समाविष्ट असून, ते आंधळा दळते आणि कुत्र पीठ खाते हे भूमिका नुसार आपलं चित्र रंगवत आहे.
कोचिंग क्लास चे कॅमेरे चेक केले असता विद्यार्थी त्या ठिकाणी दिसत आहे, संबंधित टायप असलेल्या महाविद्यालयात तो कॅमेरात दिसत नाही.
ज्यावेळेस महाविद्यालयाची परीक्षा होते त्यावेळेस या विद्यार्थ्यांची परीक्षा कोचिंग क्लास मध्येच होते, व तेवढे पेपर तो ज्या महाविद्यालयासोबत टायप असतो, त्या महाविद्यालयाच्या संबंधित विषयाच्या गठ्यात टाकल्या जाते. हा  संशोधनातून चर्चेचा विषय आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page