Thursday, April 23, 2026
HomeSanghtanaराज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर, सलग 3 ऱ्या...
spot_img

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर, सलग 3 ऱ्या दिवशीही राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर, सलग 3 ऱ्या दिवशीही राज्य सरकारी कर्मचारी  बेमुदत संपावर

ज्योत्स्ना वानखेडे:
               राज्य सरकारी कर्मचारी  यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूरच्या वतीने दिनांक 21 एप्रिल 2026 पासून आज 3 ऱ्या दिवशीही राज्य सरकारी कर्मचारी  यांचा बेमुदत संप सुरुच आहे.
          वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलने करण्यात आली. परंतु मागण्या अजूनही प्रलंबित आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील “एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता” पुर्ववत सुरू राहण्याकरीता शासनाने सुधारीत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे, लिपीकांच्या वेतन त्रृटी दूर करुन पदोन्नतीचे टप्पे कमी करावे, सुधारीत पेन्शन योजना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्याची घोषणा झाली परंतु त्या संदर्भातील नियम व कार्यपध्दती निश्चित करा, चार कामगार संहीता रद्द करा, 8 व्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा आढावा घेणे तसेच 18 प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ह्या संपाला जिल्हा तसेच तालुका स्तरावर शासकीय कर्मचारी तथा शिक्षक उर्त्स्फुत प्रतिसाद देताना दिसत आहे.
          जिल्हा तथा तालुका स्तरावर संपात प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग दर्शवून संप 100 टक्के यशस्वी केला आहे. शासनासोबत प्रलंबित मागण्याबाबत यशस्वी चर्चा होवून शासन जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरु राहील असा ठाम निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तथा राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देतांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, राजु धांडे, श्रीकांत येवले, संतोष अतकारे, अविनाश बोरगमवार, अजय मेकलवार, राकेश शेंडे, सीमा पॉल, अतुल किनेकर, अमोल शिंदे, अजय चहारे, नारायण मोरे, दिपक हिवरे, मनोहर धाईत, महेश नाडमवार,  रजनी आनंदे, सतीश असरेट, लीना जांभुळकर, नम्रता सरोवरे, भाग्यश्री श्रीरामे, शैलेश जुमनाके, धनराज मस्के, प्रवीण अदेंकीवार, प्रकाश राऊत, अरुण घोरपडे आदींनी आपली उपस्थिती दर्शविली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page