कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ११ व्या महाअधिवेशनाचे उद्घाटन करणार. बेंगलूरू येथे ७ ऑगस्ट २०२६ ला महाअधिवेशन
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ११ व्या महाअधिवेशनाचे उद्घाटन करणार.
बेंगलूरू येथे ७ ऑगस्ट २०२६ ला महाअधिवेशन
*ज्योत्स्ना वानखेडे*: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे अधिवेशन बेंगलोर येथे ७ ऑगस्ट २०२६ रोजी ज्ञानज्योती ऑडिटोरियम डॉ मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी बेंगलूरू येथे होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धारामया माजी मुख्यमंत्री, कर्नाटका, डॉ. जी. परामेश्वरा उपमुख्यमंत्री कर्नाटक, काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष आमदार बी. के. हरिप्रसाद , प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी तेलंगणाचे बोम्मा महेश कुमार गौड ,एच. डी. कुमारस्वामी केंद्रीयमंत्री, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र, ओबीसी मंत्री अतुल सावे महाराष्ट्र, , याचीन्द्रा सिद्धारामया नगर विकास मंत्री, पोन्नाम प्रभाकर गारु, ओबीसी कल्याण मंत्री, कर्नाटका राज्य, कोंडा सुरेखा गारु पर्यावरण, वन मंत्री, तेलंगाना राज्य, वकाती श्रीहरी गारु, क्रीडा, युवा सेवा मंत्री, तेलंगाना , यु. टी. कादेर आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री, कर्नाटक राज्य, रामलिंग रेड्डी सिंचन मंत्री, कर्नाटक राज्य, प्रतिभाताई धानोरकर खासदार, महाराष्ट्र, वडीराजू रविचन्द्रा खासदार, तेलंगाना , डॉ. परिणय फुके आमदार महाराष्ट्र, अभिजित वंजारी आमदार, महाराष्ट्र, सुधाकर अडबाले आमदार, महाराष्ट्र, संजय दरेकर आमदार, महाराष्ट्र, आशिष देशमुख आमदार, महाराष्ट्र राज्य, हनुमंतराव माजी खासदार, तेलंगाना , ईटेला राजेंदर गारु माजी मंत्री, तेलंगाना , मधु बंगारप्पा आमदार, कर्नाटक , आर. अशोका विरोधी पक्ष नेता, कर्नाटक, एस. मधुसुदम चारी गारु विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, तेलंगाना , जी. सी. चंद्रशेखर राज्यसभा सदस्य, यदुवीर के. चामारजा वाडियार सांसद, कर्नाटक , सुरेश कुमार शेरकर सांसद, तेलंगाना , बी.वाय. विजयेंद्र आमदार, कर्नाटक , वीस्लापाल्ली शंकर गारु आमदार, कर्नाटक , एन. ए. हॅरिस आमदार, कर्नाटक , नेलीक्रांती सत्यम गारु विधान परिषद सदस्य, कर्नाटक , रघु कौटिल्य विधान परिषद सदस्य, कर्नाटक , डॉ. सी.एन. अश्वार्थ नारायण माजी उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री कर्नाटक , महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र, डी. टी. श्रीनिवास मागासवर्गीय आयोग अध्यक्ष, कर्नाटक , वी. श्रीनिवास गौड गारु माजी मंत्री, तेलंगाना र, गांगुला कमलाकर गारु माजी मंत्री, तेलंगाना , बिर्ला हैः आमदार, तेलंगाना , अधी श्रीनिवास गारु आमदार, तेलंगाना , मधु यास्की गौड गारु माजी खासदार, तेलंगाना , हे निमंत्रित आहेत. पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास राहणार आहेत.
महासंघ दरवर्षी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्यांसाठी ७ ऑगस्टला अधिवेशन आयोजित करत असते. केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी,आणि २०२७ जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा , आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वरून हटवण्यात यावी व लोकसंखेच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावे, ४ मार्च २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण पूर्ववत सुरू करण्याकरिता संविधानाच्या कलम २४३ डी (६) व कलम २४३ टी (६) मध्ये सुधारणा करण्यात यावी, देशातील ओबीसींना लोकसंखेच्या प्रमाणात २७ टक्के राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे, १३ सप्टेंबर २०१७ पासून क्रिमिलेअरची मर्यादा वाढलेली नाही, ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत मर्यादा २० लाख करण्यात यावी, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार बहाल करण्यात यावा, ओबीसी प्रवर्गातील शेतकरी आणि शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर पेशन योजना करण्यात यावी तसेच बेंगलोर येथील अधिवेशनात २६ प्रलंबित मागण्याचा सुद्धा ठराव घेण्यात येईल., यासह विविध प्रलंबित मागण्या या अधिवेशनात करण्यात ठराव घेण्यात येतील. अधिवेशनाला ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, प्रा शेषराव येलेकर, किरण पांडव, शरद वानखेडे, राजकुमारगिरी गोसावी, गुणेश्वर आरीकर, दिनेश चोखारे, प्रकाश साबळे, रत्नमाला पिसे, सुभाष घाटे, डॉ. विनोद चौधरी, डॉ. प्रकाश भागरथ, ज्योतीताई ढोकणे, सुरज बेलोकर, आवाहन यांनी केले आहे.