*बल्लारपूर पोलिसांनी केला अवैध्यदेशी दारू वाहतुकीचा पर्दाफाश*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
*घटनेची माहिती:*
पोलीस ठाणे, बल्लारपूर येथे दि. *06/08/2026* रोजी दुपारी *15:57 वा. ते 16:20 वा.* दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या खबरेवरून राजेंद्र प्रसाद वार्ड, मक्का मस्जिद ते नाग मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याने एक इसम जांभळ्या रंगाच्या चारचाकी वाहनात अवैध्यरित्या दारू बाळगून जात आहे.
या खबरेवरून आम्ही पंच व पोलीस स्टाफसह राजेंद्र प्रसाद वार्ड, नाग मंदिर जवळील रस्त्यावर नाकाबंदी केली असता, *टाटा कंपनीची इंडिगो मांझा वाहन क्र. MH-34 AA-6906* मक्का मस्जिद ते नागमंदिर कडे येताना दिसले.
वाहन थांबवून तपासणी केली असता चालकाचे नाव *ख्वाजा शेख उर्फ बडे मोहम्मद शेख*, वय *52 वर्षे*, धंदा-मजूरी, रा. साईबाबा वार्ड, भेंडे नाला, बल्लारपूर, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर असे निष्पन्न झाले.
*वाहनातून काय जप्त केले?*
1. *मागील बाजू*: खाकी रंगाचे खरडयाचे बॉक्स – त्यात *रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारू 90 ML* च्या सिलबंद प्लॅस्टीक चापट शिशा
2. *मधला भाग*: खाकी रंगाचा बॉक्स – त्यात
– *Sahyandri GOLD PREMIUM WHISKY 180 ML* च्या काचेच्या शिशा
– *MUMBAI MALT WHISKY 90 ML* च्या प्लॅस्टीक चापट शिशा
असा *देशी व विदेशी दारूचा एकूण 03,28,070/- रु. चा मुद्देमाल* अवैध्यरित्या मिळून आला. सदरचा माल जप्त करून *पो.स्टे.ला. अप क्र. 821/2026 कलम 65(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा* न्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*कारवाई करणारी टीम:*
सदरची कार्यवाही *मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी सा., मा. अपर पो. अधीक्षक ईश्वर कातकडे सा., श्री. सुधीर नंदनवार सा. उपविभागीय पो. अधिकारी, राजूरा* यांच्या मार्गदर्शनात
*पो. निरीक्षक बिपीन इंगळे, पोलीस उप.निरीक्षक उमेश जोगदंड, पो.अं. महेश कुकुडकर/1527, फुलचंद लोधी/1601, शांतकुमार घोसे/983, लखन चव्हाण/1202* इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला.