Saturday, August 8, 2026
spot_img
HomeJanjagruti*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे व्यसनमुक्ती जनजागृती...

*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान*

*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे  व्यसनमुक्ती जनजागृती अभियान*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर व मिशन स्पंदन, ब्रह्मकुमारीज बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बी. के. स्मिता दीदी, आणि बी.के. विनोद भाईजी  यांनी तंबाखू, गुटखा,सिगारेट मद्यपान तसेच इतर अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे शारीरिक,मानसिक, सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर अगदी सोप्या भाषेत मांडले.
व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवन जगण्याचा तसेच कुटुंब व समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाबरोबरच चरित्र व संस्कृती याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका मा. असमा खान मॅडम, बी.के. स्मिता दीदी,बी के विनोद भाईजी, बी.के. डॉ. क्षमा बहन उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वंदना किसान मॅडम यांनी केले तसेच व्यसनमुक्ती जनजागृती अभियान यामध्ये सर्व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page