Saturday, August 8, 2026
spot_img
HomeChandrapur*पोस्टे पडोली पोलिसांची बेकायदेशीर अंमली पदार्थ (NDPS) विरोधात विशेष तपासणी मोहीम*

*पोस्टे पडोली पोलिसांची बेकायदेशीर अंमली पदार्थ (NDPS) विरोधात विशेष तपासणी मोहीम*

*पोस्टे पडोली पोलिसांची बेकायदेशीर अंमली पदार्थ (NDPS) विरोधात विशेष तपासणी मोहीम*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर जिल्हा *अंमली पदार्थमुक्त* करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक योजना व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
त्याच दरम्यान *पोलीस स्टेशन पडोली* हद्दीत अंमली पदार्थांची *ने-आण करणाऱ्या* आरोपी विरुद्ध प्रभावी कारवाई करण्यासाठी दि. *06/08/2026* रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.
*मोहीम कुठे झाली?*
चंद्रपूर – नागपूर मार्गावरील *छत्रपती संभाजी महाराज चौक, पडोली* येथे नाकाबंदी करून वाहतूक करणाऱ्या बसेस व खाजगी ट्रॅव्हल्सची *श्वान पथकाचे (नार्को डॉग)* सहाय्याने संपूर्ण तपासणी करण्यात आली.
*जनतेला आवाहन*
मोहीम दरम्यान प्रवाशांना *टिपलाईन क्रमांक 7887890100* या क्रमांकाची प्रसिद्धी देऊन पोलिसांना सहकार्य करण्याबत आवाहन करण्यात आले.
सदर अंमली पदार्थमुक्त मोहीमेमुळे जनमानसात चर्चा असून प्रतिबंधित अंमली पदार्थांची अवैधरित्या ने-आण करणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
*मार्गदर्शन*
सदरची मोहीम *मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर* यांच्या आदेशाने, *मा. अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर* व *मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर विभाग* यांच्या मार्गदर्शनात *ठाणेदार, पोस्टे पडोली* यांनी केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page