*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन मुल, जिल्हा चंद्रपूर
अप क व कलम १) ६८२/२०२६ कलम २२३ भारतीय न्याय संहिता सहकलम ३८, १३६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम २) ६८३/२०२६ कलम २२३ भारतीय न्याय संहिता सहकलम ३८, १३६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम
फिर्यादीचे नाव सरतर्फे सपोनि. सुरेश कनाके, पोलीस स्टेशन मुल जि. चंद्रपूर
मार्गदर्शन करणारे अधिकारी
१) आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर २) ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर ३) सत्यजित आमले, उप विभागीय पोलीस अधिकारी, मुल ४) विजय आर. राठोड पोलीस निरीक्षक
कार्यवाही करणारे अधिकारी व अंमलदार
पोलीस स्टेशन मुल १) सपोनि. सुरेश कनाके २) ग्रेडपोउपनि उत्तम कुमरे ३) पोहवा नरेश कोडापे ब.नं. १८३ ४) पोहवा. नरेंद्र वाकडे ब.नं. २६२३ ५) पोअं. दिलीप आदे बं.नं. २७१० ६) पोअं. शंकर बोरसरे बं.नं. १२३२ ७) प्रकाश चिकराम बं.नं. २३९४ ८) पोअं. गणेश आदे बं.नं. १९४० ९) अरविंद मेश्राम ब.नं. १३९३
घटना तारीख व वेळ दि. २२/०९/२०२६ चे १२/०० वा. ते १३/१० वा. दरम्यान
दाखल तारीख दि. २२/०९/२०२६
घटनास्थळ मौजा नवेगाव, आलेवाही पो. राजोली ता. मुल जि. चंद्रपूर २१ किमी दक्षिण
आरोपी नाव १. अप क्र. ६८२/२०२६ १) रोहीत युवराज येलमुले, वय २५ वर्ष, व्यवसाय डिजे मालक/ऑपरेटर, रा. सिंदपुरी ता. पवनी जि. भंडारा २) भास्कर प्रल्हाद ढोरे, वय २५ वर्ष, व्यवसाय गाडी चालक, रा. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा ३) सुरज राजु मारबते, वय २८ वर्ष, रा. आलेवाही ता. मुल जि. चंद्रपूर
२. अप क्र. ६८३/२०२६ १) गंगाधर सुखदेव बोरकर, वय ४२ वर्ष, व्यवसाय डिजे मालक/ऑपरेटर रा. टेकारी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर २) रोशन गजानन टिकरे, वय २१ वर्ष, व्यवसाय गाडी चालक रा. सायमारा, ता. सावली जि. चंद्रपूर ३) वैभव धर्मराव तलांडे, वय २२ वर्ष, रा. नवेगाव, आलेवाही, ता. मुल जि. चंद्रपूर
मिळून आलेला माल: १. न्युमार्क M6 कंपनीचा ०१ मिक्सर किं अंदाजे किंमत रु. १०,०००/- २. गँगस्टर ऑडिओ मशीन ०१ नग किं अंदाजे किंमत रु. ५०,०००/- ३. डायनामाईट मशीन ०१ नग अंदाजे किंमत रु. २०,०००/- ४. वि. एम कंपनीचे ड्युअल स्पीकर बॉक्स ०४ नग किं अंदाजे किंमत रु. २,००,०००/- ५. वि. एम कंपनीचे टॉप ०२ नग किं. अंदाजे रु २,५०,०००/- ६. टाटा एल.पी.टी. कंपनीची गाडी क्रमांक MH 36 AA 4191 इंजिन क्र. 4SPCR19JVX628500 चेसिस क्र. MAT555033R8J16006 किं. अंदाजे किंमत रु. ८,००,०००/- ७. टाटा एल.पी.टी. कंपनीची गाडी मध्ये लागलेला टाटा किर्लोस्कर कंपनीचा जनरेटर किं. अंदाजे २,५०,०००/- वरीलप्रमाणे जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत रु. १५,८०,०००/- इतकी आहे.
मिळून आलेला माल: १. न्यूमार्क M6 कंपनीचा ०१ मिक्सर किं अंदाजे किंमत रु. १५,०००/- २. झाईपर ऑडिओ मशीन ०२ नग किं अंदाजे किंमत रु. ८०,०००/- ३. डायनामाईट मशीन ०१ नग कि. अंदाजे किंमत रु. ६५,०००/- ४. MX कंपनीचे ड्युअल स्पीकर ०२ नग किं अंदाजे किंमत रु. ५०,०००/- ५. टॉप ०२ नग किं. अंदाजे रु १,२५,०००/- ६. टाटा ७०९ कंपनीची पिकअप गाडी क्रमांक MH 01 BR 2461 जिचा इंजिन क्र. 497TC41FTY821994 चेसिस क्र- MAT506505G8G17513 किं, अंदाजे किंमत रु. ५,००,०००/- ७. टाटा किर्लोस्कर कंपनीचा जनरेटर किं. अंदाजे १,८०,०००/- ८. पावर सेवर किंमत अंदाजे १५,०००/- एकूण अंदाजे किंमत रु. १०,३०,०००/- इतकी आहे. असा एकूण २६.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
*हकीकत:-*
याप्रमाणे आहे कि, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी दिनांक २२/०९/२०२६ रोजी गणेश विसर्जन बंदोबस्ताच्या अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक सुरेश व पोलीस पथक पेट्रोलिंग व ध्वनीक्षेपणाची मर्यादा तपासणी करीत असताना, आलेवाही नवेगाव परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी परवानगीविना मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याची माहिती मिळाली. दोन्ही ठिकाणी पोलीस पथकाने पंचांसह प्रत्यक्ष पाहणी करून ध्वनीमापक यंत्राद्वारे डीजेच्या आवाजाची तपासणी केली. सदर तपासणीमध्ये अनुक्रमे ७७.०३ डेसिबल व ७३.५० डेसिबल इतकी ध्वनीतीव्रता नोंदविण्यात आली.
*पहिली कारवाई – जय वाल्मीकी गणेश मंडळ, आलेवाही*
आलेवाही नवेगाव येथे MH-36 AA-4191 क्रमांकाच्या टाटा LPT वाहनावर डीजे साऊंड सिस्टिम बसवून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपण सुरू असल्याचे आढळून आले. ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी केली असता ७७.०३ डेसिबल ध्वनीतीव्रता नोंदविण्यात आली. चौकशीदरम्यान डीजे मालक/ऑपरेटर रोहित युवराज येलमुले, वय २५ वर्षे, रा. सिंदपुरी, ता. पवनी, जि. भंडारा याने सदर डीजे जय वाल्मीकी गणेश मंडळ, आलेवाही यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आयोजकाच्या सांगण्यावरून वाजवित असल्याचे सांगितले. तसेच डीजे वाजविण्याबाबत कोणतीही वैध परवानगी घेतलेली नसल्याचे चौकशीत समोर आले. या कारवाईत डीजे साऊंड सिस्टिम, स्पीकर, मिक्सर, मशीन, जनरेटर व टाटा LPT वाहन असा एकूण अंदाजे १५,८०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
*दुसरी कारवाई – उज्ज्वल ज्योत गणेश मंडळ, नवेगाव आलेवाही*
नवेगाव आलेवाही येथे MH-01 BR-2461 क्रमांकाच्या टाटा ७०९ पिकअप वाहनावर डीजे साऊंड सिस्टिम बसवून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपण सुरू असल्याचे आढळून आले. ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी केली असता ७३.५० डेसिबल ध्वनीतीव्रता नोंदविण्यात आली. चौकशीदरम्यान डीजे मालक/ऑपरेटर गंगाधर सुखदेव बोरकर, वय ४२ वर्षे, रा. टेकरी, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर याने सदर डीजे उज्ज्वल ज्योत गणेश मंडळ, नवेगाव आलेवाही यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आयोजकाच्या सांगण्यावरून वाजवित असल्याचे सांगितले. तसेच सदर डीजे वाजविण्याबाबत कोणतीही वैध परवानगी घेतलेली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या कारवाईत डीजे साऊंड सिस्टिम, स्पीकर, मिक्सर, जनरेटर, पावर सेवर व टाटा ७०९ पिकअप वाहन असा एकूण अंदाजे १०,३०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही स्वतंत्र कारवायांमध्ये डीजे साऊंड सिस्टिम, मिक्सर, ऑडिओ मशीन, स्पीकर, जनरेटर, पावर सेवर तसेच दोन वाहने असा एकूण अंदाजे २६,१०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये डीजे मालक/ऑपरेटर, वाहन चालक व आयोजक यांच्याविरुद्ध कलम २२३ भारतीय न्याय संहिता तसेच कलम ३८ व १३६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
*पोलीस स्टेशन मूलचे आवाहन*
गणेश विसर्जन मिरवणुका व आगामी सार्वजनिक उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावेत, यासाठी सर्व गणेश मंडळे, आयोजक, डीजे मालक व ऑपरेटर यांनी ध्वनीक्षेपणासंदर्भातील लागू नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. डीजे किंवा ध्वनीक्षेपणाची साधने वापरताना आवश्यक वैध परवानगी घेणे, निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन करणे तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.