Tuesday, May 5, 2026
HomeParbhaniशिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान सातत्याने अवगत करावे-ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. गणेश शिंदे यांचे प्रतिपादन.
spot_img

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान सातत्याने अवगत करावे-ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. गणेश शिंदे यांचे प्रतिपादन.

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान सातत्याने अवगत करावे-ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. गणेश शिंदे यांचे प्रतिपादन.

सेलू येथे तालुकास्तरीय शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात.

श्रेयश वानखेडे:
शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनविन बदल होत असून शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान सातत्याने अवगत करावे व निरंतर अपडेट राहावे असे प्रतिपादन परभणी डाएट चे ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा सेलू तालुका संपर्क प्रमुख अधिकारी प्रा गणेश शिंदे यांनी केले.तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सेलू तालुक्यातील गुणवत्ता वाढी साठी विशिष्ट कृती कार्यक्रम राबविणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.सेलू येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात पंचायत समिती शिक्षण विभाग सेलू गटशिक्षणा धिकारी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित तालुकास्तरीय शालेय व्यवस्था पन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण उदघाटन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.या वेळी व्यासपीठावर परभणी जि. प चे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी तथा सेलू चे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, परभणी येथील  हर्टफुल नेस मेडिटेशन एकात्मिक अभियान चे जयप्रकाश भंडारी, मीनाताई भंडारी, किशोर जामकर, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे आदिची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी मान्यवरांचे योगेश ढवारे यांनी लिहिलेल्या भाषण एक कला हे पुस्तकं भेट देऊन स्वागत करण्यात आले.पुढे बोलताना शिंदे सरांनी निपुण भारत अभियान व कृती कार्यक्रम तथा शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक म्हणून आपली जबाबदारी यावर समर्पक मार्गदर्शन केले.मार्गदर्शन पर मनोगतात गजानन वाघमारे साहेबांनी सर्व शिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.सेलू तालुका समन्वयक सुनीता काळे यांच्या आयोजनाखाली या प्रशिक्षणास प्रारंभ झाला. जयप्रकाश भंडारी व मीना ताई भंडारी यांनी मेडिटेशन ची 45 मिनिटांची तासिका घेऊन सर्वांना ध्यानाचे महत्व पटवून दिले.दोन दिवस चालणाऱ्या या तालुका स्तरीय प्रशिक्षणासाठी 105 शिक्षक प्रशिक्षण घेणार असून सुलभक म्हणून नीळकंठ पाटील, रावजी चिलके, राम रोडगे, मोहम्मद बदरुद्दीन हे कार्य पार पाडणार आहेत. या प्रशिक्षण उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट समन्वयक सुनीता काळे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार योगेश ढवारे यांनी मानले.
प्रशिक्षण यशस्वीतेसाठी भूजंग थोरे,विषय शिक्षक आश्विनी आमले,डेटा ऑपरेटर अरुण राऊत आदी परिश्रम घेत आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page