जनता विद्यालय ताडाळी येथे महाराष्ट्र दिन साजरा

श्रेयश वानखेडे:
दिनांक 1 मे 2025 रोजी जनता विद्यालय ताडाळी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यार्थी, पालक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 या विषयावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक निवडण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन या निमित्ताने भाषणे दिली. प्रमुख मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी.जी. जिवतोडे सर यांनी महाराष्ट्र दिन, कामगार दिन व महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी होते.