Tuesday, May 5, 2026
HomeParbhaniप्रिन्स इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांची निकालामध्ये उत्तुंग भरारी.
spot_img

प्रिन्स इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांची निकालामध्ये उत्तुंग भरारी.

प्रिन्स इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांची निकालामध्ये उत्तुंग भरारी.

श्रेयश वानखेडे: 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई ) निकाल आज जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी निकालाची परंपरा कायम ठेवत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. यामध्ये शाळेची विद्यार्थिनी खुशी मानधने हिने 98.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. ज्योतिरादित्य देशमुख याने 98.20 गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर स्नेहल लंगडे या विद्यार्थिनीने 96.80% मिळून तिसरा क्रमांक मिळवला आहे. धैर्यसोनी 96.40%, आदित्य साखरे 96.20%, अंकिता  तैनाक 96%, प्रताप भाबट 95.60%,

अथर्व नंद 95.40%, शुभंकर जोशी 94.80%, नैतिक काला 93.80%, आदित्य लाटे 93.80%, युवराज भोसले 92.60%, पृथ्वीराज चव्हाण 92.20%, वकार अहमद अन्सारी 92.20%, अभिजीत गजमल 91.20%, वीरेंद्र गजमल 91.20%, तनुष सासवडे 91.20%, पुष्कर पुरी 91%, दर्शिका दगडू 90.80%, व्हिजन खाडे 90.80%, ईश्वरी सारडा  90.60%, आदेश कदम 90.20%, गायत्री सिरस 90.20% रिया बोराडे 90% असे गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत. प्रिन्स इंग्लिश स्कूल चे एकूण 89 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते, त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झालेले आहेत. दरम्यान ८९ विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थी हे 90% च्या वरती गुण मिळवून  विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच शाळेचे नावलौकिक वाढविले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ.  सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, शाळेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. सलग चौदा वर्षाची यशाची परंपरा कायम राखल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे व संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page