Jyotsna Wankhede:
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवित्री, लेखिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा
3 जानेवारी हा जन्मदिवस ‘बालिका दिन’ म्हणून दिनांक 3 जानेवारी 2026 रोज शनिवारला सरस्वती विद्यालय मुधोली ता.भद्रावती विद्यालयात साजरा करण्यात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
बालिका दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.
चित्रकला स्पर्धा, भिडे वाड्यातील मुलींची पहिली शाळा, शिक्षणावर/साक्षरतेवर आधारीत विविध गीतावरील मुलींनी नृत्य सादर केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री खोंड सर, प्रमुख अतिथी टेकाडी गावच्या सरपंचा सौ देवयानी झाडे ताई, तसेच प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष श्रावणजी नन्नावरे मंचावर उपस्थित होते. प्रज्वल सोयाम यांनी महात्मा ज्योतिबा फुले तर पूर्वा जांभुळे यांनी सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला होता. शाळेतील शिक्षक श्री शेख सर,
गेडाम सर, जांभुळे सर, बागेसर मॅडम, कुळमेथे मॅडम, पोईनकर मॅडम , शिक्षकेतर कर्मचारी, शाळा नायक, शाळा नायिका, वर्ग 05 ते 10 वी तील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीतील कुमारी वेदिका रंदये व कुमारी वैष्णवी चौखे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायत्री चौखे तर आभार कु.रामटेके मॅडम यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.