खाजगी शाळा शिक्षक संघाचे,२३ फेब्रुवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर कार्यालया समोर आंदोलन !
ज्योत्स्ना वानखेडे:
संच मान्यता, शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२५ रद्द करणे, आरटीई जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता २०२५-२६ निश्चित करणे शिक्षणाधिकारी या पदावर पदवी अधिक बी एड शैक्षणिक पात्रता निश्चित करणे, शासन सेवेत दिनांक १ नोव्हेंबर २००५ पुर्वी जाहिरात, जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे, त्याप्रमाणे खासगी शाळेतील शिक्षक कर्मचारी यांना लाभ देणे,वरिष्ठ श्रेणी वेतन निश्चित प्रकरणात शिक्षणाधिकारी यांचेकडे सोपविल्यामुळे गोंधळ व भ्रष्टाचारास चालना मिळालेली आहे, शिक्षण विभाग व आरोग्य विभागाच्या र्निदेशातुन कोरोना-२०१९ सर्वक्षण कामात मृत्यु पावलेल्या कोरोना योदधा सानुग्रह अनुदान ₹५० लक्ष रक्कम मिळालेली नाही. नागपुर विभागातील, माध्यमिक विभाग जिल्हा परिषद नागपूर मयत रामदास काकडे, बालाजी हायस्कूल हिंगणा, नागपूर तसेच माध्यमिक विभाग जिल्हा गडचिरोली मयत दीपक सोमनकर,बोमनवार हायस्कूल चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांच्या वारसांना अनुग्रह अनुदान मिळणे.
नागपूर जिल्ह्यातील ६३२ शिक्षक-कर्मचारी यांचे माहे मार्च २०२५ पासुन बंद आहे, मा उच्च न्यायालय निर्णय आधारावर, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे वेतन मोकळे करणे याचा आधार घेऊन त्यांचे वेतन मोकळे करणे, खाजगी प्राथमिक शाळेतील मान्यता प्राप्त मुख्याध्यापक यांना अर्जित रजा रोखीकरण लाभ ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक ६ डिसेंबर २०२२ व शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांचे पत्र दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ नुसार, शासन निर्णय निर्गमित करणे.
शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ अन्वये इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लागु करण्यात आली आहे, त्यामुळे त्यापुर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लागु करणे चुकीचे ठरेल याबाबत संबंधितांना निर्देश देणे,मा.ना.डाॅ.पंकज भोयर, शिक्षण राज्यमंत्री यांना त्यांनी रवीभवन नागपूर येथे घेतलेल्या बैठकीत खाजगी शाळा शिक्षक संघाने, दिनांक १ ऑक्टोबर २०२५ ला दिलेल्या निवेदनावर निर्णय घेणे,अनुकंपा शिक्षण सेवक नियुक्तित टीईटी परीक्षा मधुन सुट मिळणे.
सीबीएससी व आयसीएससी मान्यता प्राप्त प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-कर्मचारी यांना सेवा समाप्ती, पदोन्नती याबाबत राज्य शासनाच्या शाळा न्यायालयाधिकरण अर्ज करण्यासाठी शिक्षण कायदा-१९७७ व सेवाशर्ती नियमावली १९८१ मध्ये सुधारणा करणे, दिपावली, उन्हाळी व नाताळ सुट्टी बाबत निर्देश प्रधान मंत्री कार्यालय, पत्र 12 फेब्रुवारी 2020 ची अंमलबजावणी करणे.
खाजगी अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान हे विलंबाने मिळते ते नियमित मिळणे, ते एप्रिल २००८ चे वेतनावर व पाचव्या वेतन आयोगानुसार मिळत आहे ते सातव्या वेतन आयोगाच्या वेतनावर अदा करणे याबाबत निर्णय घेणे,शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर ,चंद्रपूर व भंडारा यांच्याकडे प्रलंबित अनुकंपा मान्यता प्रकरणात दुर्लक्ष करणारे, माध्यमिक शाळेत शिक्षक नियुक्तीत वयाचे बंधन नाही हे उच्च न्यायालयाने सेवाशर्ती नियमावली नियम तीन चा उल्लेख करून स्पष्ट असुनही मान्यता न देणाऱ्या, प्रकरणे प्रलंबित ठेवणार्या अधिकाऱ्यांवर शिक्षण हक्क कायदा नुसार प्रकरणे प्रलंबित ठेवल्यामुळे दंडात्मक कारवाई करणे.
खासगी शाळा शिक्षक संघाने विधीमंडळ अर्थ संकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ ,दुपारी तीन ते सायंकाळी पाच पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे, रवींद्र मोटघरे, अध्यक्ष, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, चंद्रपूर यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.
शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वश्री किशोर दहेकर, रवींद्र जेनेकर, पुरुषोत्तम टोंगे,प्रमोद रेवतकर, मनिष वांढरे, किरण खोब्रागडे, पितांबर वांढरे, रवींद्र मोटघरे,आशिष टीपले, गंगाधर खिरटकर,बंडु बर्डे, रवींद्र पडवेकर, सौ.भाग्यश्री देशमुख, धनराज मुनघाटे, सुरेश श्रीरामे, मारोती पाटील, देवीदास नांदुरकर, श्रीमती जयश्री करकाडे, आशुतोष गाजेवार, विजय खोब्रागडे, देवदास पडोळे, श्रीमती उषा भास्कर खोब्रागडे, श्रीमती वीणा गेडाम,श्रीमती संध्या वसंत वरभे, श्रीमती कुंदा विजय उडान यांनी केले आहे.