Saturday, June 20, 2026
HomeSpardhaचंद्रपूर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा- बक्षीस वितरण व समारोप सोहळा संपन्न
spot_img

चंद्रपूर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा- बक्षीस वितरण व समारोप सोहळा संपन्न

चंद्रपूर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा- बक्षीस वितरण व समारोप सोहळा संपन्न

ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक : १ मार्च २०२६ रोजी चंद्रपूर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा – बक्षीस वितरण व समारोप सोहळा,
गोंडराजे बल्लारशाह नाट्यगृह, बल्लारपूर, येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. रवींद्र भेलावे-विभागीय सह आयुक्त नागपूर यांची उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. डॉ. अल्का अनिल वाढई- नगराध्यक्षा, न.प. बल्लारपूर,मा. श्री. शेखर अनिल वाढई, मा. श्री. प्रफुल्लजी चटकी-नगराध्यक्ष, न.प. भद्रावती, मा. श्रीमती विशाखा शेळकी-मुख्याधिकारी, नगर परिषद, भद्रावती,
मा. श्री संदिप दोडे-मुख्याधिकारी, नगर परिषद, मुल व नगर पंचायत सावली सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांना रोपट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. बल्लारपूर नगर परिषद तसेच जिल्ह्यातील इतर सर्व नगर परिषदांची मान्यवर उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.
सर्व नगरपरिषदांनी सहभाग नोंदवित क्रीडास्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय विजय संपादन केला.
अभिमानास्पद यश.!
नगर विकास विभाग आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२६, चंद्रपूर या स्पर्धेत नगरपरिषद बल्लारपूर यांनी विविध क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय व दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सातत्यपूर्ण उत्कृष्ट प्रदर्शन, संघभावना आणि जिद्दीच्या बळावर यावर्षीचा चॅम्पियनशिपचा मान नगरपरिषद बल्लारपूर यांनी अभिमानाने पटकावला आहे.
बल्लारपूर शहरासाठी ही निश्चितच गौरवाची व अभिमानाची बाब ठरली आहे. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page