Thursday, April 16, 2026
HomeParbhaniसमाज माध्यमांचा योग्य वापर करा - डॉ. संगीता आवचार.
spot_img

समाज माध्यमांचा योग्य वापर करा – डॉ. संगीता आवचार.

समाज माध्यमांचा योग्य वापर करा – डॉ. संगीता आवचार.

व्याख्यानास महिला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .

ज्योत्स्ना वानखेडे: मोबाईल आपल्यासाठी आहे हे लक्षात ठेवावे. आपली खाजगी माहिती, फोटो कुणालाही शेअर करू नये. कुटुंबाला वेळ देवून मुलांशी संवाद साधावा. जीवनाच्या प्रगतीसाठी सामाज माध्यमांचा वापर योग्य आणि मर्यादित व्हायला हवा. असे प्रतिपादन डॉ.संगीता आवचार यांनी केले. नूतन विद्यालय शिक्षण संस्था व महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत जयंती वर्ष आणि महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात परभणी येथील कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संगीता आवचार यांचे ‘ समाज माध्यमांमुळे महिलांची सुरक्षितता आणि समाज व्यवस्था धोक्यात ‘ या विषयावर शुक्रवार ( दि.२७) रोजी नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया होते. व्यासपीठावर सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर यांची उपस्थिती होती. व्याख्याता डॉ. संगीता आवचार पुढे म्हणाल्या की, “स्त्रियांनी समाज माध्यमातून त्यांना त्रास देणाऱ्या आक्षेपार्ह संदेशा संदर्भात निर्भयपणे व्यक्त व्हावे.एक दिवस मोबाईलचा उपवास करावा. स्त्रियांचे देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान आहे. या जाणीवेने जीवनाची वाटचाल करावी.” असेही डॉ. संगीता आवचार म्हणाल्या. कार्यक्रमात ललिता गिल्डा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रणिता सोलापूरे यांनी करून दिला. सुत्रसंचलन हेमलता देशमुख यांनी केले. तर आभारप्रदर्शन महिला उपक्रम संयोजक मुख्याध्यापक निशा पाटील यांनी केले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सदस्य अजीज खा पठाण,श्रीरामजी भांगडीया शतकोत्तर रजत जयंती वर्षचे संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.सुभाष बीराजदार, करूणा बागले,वसुधा खारकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. व्याख्यानास महिला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page