ज्योत्स्ना वानखेडे:
जिल्हा परिषद चंद्रपूर प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. सौ अश्विनी केळकर यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद समन्वय समितीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष विनोद पांढरे, कॉन्व्हेंट विभागाचे प्रमुख विवेक आंबेकर, प्राथमिक विभाग अध्यक्ष सरिता सोनकुसरे, जिल्हा परिषद शिक्षक प्राथमिक विभाग अध्यक्ष देठे सर व प्राथमिक विभाग कार्यवाह संतोष सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.
यात जिल्हा परिषद प्राथमिक विभाग शिक्षकांच्या समस्या, खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या तक्रारी व कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
बहुसंख्य कॉन्व्हेंट शाळेत शालेय नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे तिथे शिक्षण उपसंचालक मा. सावरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाद्वारे संयुक्त चौकशी समितीची स्थापना करून कॉन्व्हेंट शाळांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. सौ. अश्विनी केळकर यांनी याप्रसंगी दिले.
त्याचप्रमाणे कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे म्हटले.