शिक्षकांचे हक्क, शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, राज्य शिक्षक संघटना, आयटीआय निदेशक संघटना तसेच विजाभज आश्रम शाळा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “शिक्षक संवाद मेळावा” गुणवंतराव देशमुख विद्यालय सभागृह, कवडीपूर तांडा, पुसद (जि. यवतमाळ) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या मेळाव्यास आमदार मा. श्री. सुधाकर अडबाले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन करताना, शिक्षकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी संघटना सातत्याने संघर्ष करत राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. सोबतच उपस्थित शिक्षकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर भूमिका मांडली. तसेच जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या GPF पावत्या अनेक वर्षापासून मिळाल्या नव्हत्या, त्या मिळवून देण्यामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा मोलाचा वाटा असल्याचे या कार्यक्रमाप्रसंगी नमूद करण्यात आले.
शिक्षक आणि पदवीधर यांनाच आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार आहे, म्हणूनच शिक्षक आणि पदवीधर यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. याचप्रसंगी आगामी अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत संघटनेचे अधिकृत उमेदवार श्री. दिलीप कडू यांना विधान परिषदेत पाठविणे, ही शिक्षकांच्या हितासाठी काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
विजाभज संघटनेच्या वतीने आमदार श्री. सुधाकर अडबाले यांचे स्वागत करण्यात आले तसेच मेळाव्यामध्ये तालुका कार्यकारिणी मधील नवनियुक्त तालुका अध्यक्ष, सचिव तसेच सदस्य यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या मेळाव्यास माजी आमदार तथा म.रा.मा.शी. महामंडळाचे सरचिटणीस श्री. व्हि. यू. डायगव्हाणे, प्रांतीय अध्यक्ष श्री. अरविंद देशमुख, अमरावती शिक्षक मतदार संघाचे संघटनेचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप कडू, माजी विभागीय कार्यवाह श्री. मुरलीधर धनरे, मुख्याध्यापक संघ विभागीय सचिव श्री. सुरेंद्र कडू, श्री. विसपुते सर, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष पवन बन, जिल्हा कार्यवाह श्री. रामकृष्ण जीवतोडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पोले सर, वर्धा जिल्हा कार्यवाह श्री महेंद्र सालंकार, मनोज जिरापुरे, श्री. जावळ सर, नंदकिशोर खडसे, सूरज डोंगरे, संघटनेचे तालुका अध्यक्ष चंद्रवंशी, जाधव, सूरज राठोड, कार्याध्यक्ष विजय खरोडे, पंजाबराव चंद्रवंशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पोले, श्री. नीरज डफळे, प्रणाल वानखेडे, पाटील सर, हेडाऊ सर, मेश्राम सर, पाटील सर, हेडाऊ सर, गणेश धर्माळे, उमेद डोंगरे, अनिल जाधव, बाळकृष्ण मंदाडे, एल.बी. मेद्रान, महादेवराव गावंडे, गंगाधर भालेराव, आकाश राठोड, अमोल पवार, प्रवीण लेंडे, पंकज राठोड, बाळासाहेब देशमुख, एम. आर. चौधरी मॅडम, वानखेडे मॅडम तसेच विमाशी संघ, राज्य शिक्षक संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.