*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक 05/08/26 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार हद्दीतील सातारा तुकूम येथील वन संरक्षण समितीच्या हॉलचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या आरोपीं विरुद्ध अप. क्र. 74/2026, कलम 305(ई), 331(3), 331(4) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये दाखले गुन्ह्याचा यशस्वी छडा लावून तीन आरोपींना अटक केली.
*आरोपी*
1. शेख नाजिम शेख हाफीज (वय 39 वर्षे), व्यवसाय – नसीब स्क्रॅप मर्चंट (भंगार दुकान), सध्या रा. चंद्रपूर.
2. मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब उर्फ सक्सेना (वय 44 वर्षे), रा. घुटकळा वॉर्ड, चंद्रपूर.
3. पैयनप्पा उर्फ कुट्टी अण्णा रवी शेट्टी, रा. सावरकर चौक, चंद्रपूर.
*गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल* :
1. HUSQVARNA कंपनीची पांढऱ्या व शेंदरी रंगाची आग विझविण्याची एअर मशीन (जुनी वापरलेली) – ₹10,000/-.
2. लोखंडी कुंपण तारचे एक बंडल (उंची 5 फूट, वजन 25 किलो) – ₹1,000/-.
3. “वनसंरक्षण समिती, सातारा तुकूम” असे लिहिलेले स्टीलचे 35 ताट – ₹3,500/-.
4. मिरची कांडप मशीनचे 5 सुटे भाग – ₹5,000/-.
*गुन्ह्याव्यतिरिक्त जप्त संशयित मुद्देमाल* :
5. नवीन अॅल्युमिनियम इलेक्ट्रिक तारचे 20 बंडल, वजन 257 किलो – ₹25,700/-.
6. पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक पोलचे 7 तुकडे, त्यावर “SARTHK HB 116 DEVELOPED UNDER RDSS” अशी नोंद असलेले, वजन 179 किलो – ₹17,900/-.
7. गंजलेल्या अवस्थेतील इलेक्ट्रिक पोलचे 6 तुकडे, त्यापैकी दोन तुकड्यांवर “13-410” व “13-370” असे क्रमांक अंकित असलेले, वजन 319 किलो – ₹31,900/-.
8. रेल्वे विभागाच्या रुळ कापणीशी संबंधित लोखंडी साहित्य (लोखंडी कड्या व लोखंडी पट्ट्या), वजन 378 किलो – ₹37,800/-. असा एकूण ₹1,32,800
तीन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी त्यांना व जप्त मुद्देमाल उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
*पथक – मुल, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर*