*ज्योत्स्ना वानखेडे*:
बल्लारपूर येथील प्रवाशांच्या सुविधेत आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली असून राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नव्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. या नव्या बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा बल्लारपूर बसस्थानक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या नव्या बसगाड्यांमुळे बल्लारपूर व परिसरातील नागरिकांना अधिक चांगली, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाला मोठी सोय होणार आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या लोकार्पण सोहळ्यास श्री. हरीशभैया शर्मा, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण, अॅड. रणंजय सिंह, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहर,श्री. काशीनाथ सिंह,श्री. समीर केने,श्री. सतविंदर सिंग दारी ,श्री. गुलशन शर्मा,श्री. सतीश कणकम,सौभाग्यवती वैशाली ताई जोशी, अध्यक्ष, महिला मोर्चा, भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहर, सौभाग्यवती रेनुका ताई दुधे, नगरसेविका विद्याताई खडतड, नगरसेविका शालूताई कुमरे, नगरसेवक मोहित डंगोरे, नगरसेवक नीरज झाडे, तसेच महिला मोर्चाच्या महामंत्री सौ. सारिकाताई कणकम, सौ. जयश्रीताई मोहोरले आणि सौ. वर्षाताई सुंचुवार, युवा मोर्चाचे महामंत्री श्री. अरविंद वर्मा, श्री. कैलाश गुप्ता, श्री. बब्लू गुप्ता, श्री. ओमप्रकाश प्रसाद, अध्यक्ष, सुधीरभाऊ यूथ क्लब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या बससेवेचे स्वागत करत प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नव्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणे ही बल्लारपूरसाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनातून आणि पुढाकारातून प्रवाशांच्या सुविधेसाठी होत असलेल्या या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन श्री. देवेंद्र वाटकर जी यांनी केले.
कार्यक्रमास भाजप पदाधिकारी, महिला व युवा मोर्चाचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, कार्यकर्ते, एसटी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.