Wednesday, August 26, 2026
spot_img
HomeChandrapur*चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संचिका जमा करण्याचे...

*चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संचिका जमा करण्याचे काम युद्ध पातळीवर*

*चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संचिका जमा करण्याचे काम युद्ध पातळीवर*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक विभागात नियुक्त शिक्षक- शिक्षकेत्तर यांचा संचिकेशी सखोल निःपक्ष तपासणी एसआयटी पथकास दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थेतील संचिका जमा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याने शिक्षण विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी यांना घाम सुटला आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन  शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक विभागात नियमबाह्य शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी पद भरती करून कोट्यवधीचा अपहार करत तत्कालीन शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी ही बोगस शालार्थ देऊन एक प्रकारे शासनाची फसवणूक केली. या बोगस भरती प्रकरणातील चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी  यांचा हात आहे का? याची तपासणी करायची आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांत बोगस शिक्षक शिक्षकेत्तर पद भरती मोठ्या प्रमाणात उघड होत असल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच खाजगी शिक्षण संस्थेत करण्यात आलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर पद भरतीच्या संचिकाची सखोल निःपक्ष तपासणी करण्याचे आदेश एसआयटीस दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक विभागाने नियुक्त शिक्षक शिक्षकेत्तर यांचा संचिका जमा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी सह शैक्षणिक दलाल यांची धावपळ सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपासून शिक्षण विभाग याच कामात व्यस्त असून सन २०२० ते २०२४ या कालावधीत  बोगस नियुक्त शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संचिका शिक्षण विभागातुन गायब असल्याचा प्रकार चौकशी अहवालात नमूद असल्याने फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिक्षक नियुक्ती बाबत खाजगी शिक्षण संस्थेने पद भरती बाबत शिक्षण विभागाकडून घेतलेली परवानगी त्या नुसार दिलेल्या वृत्तपत्रातील जाहिरात संस्थेने घेतलेला ठराव अध्यक्ष सचिव अथवा शालेय समितीचा ठराव यांचा सह्या मुख्याध्यापक यांचा सह्या यांची सखोल तपासणी एस आय टी पथका कडून होणार असल्याने खाजगी शिक्षण संस्था पूर्णपणे अडचणीत आलेल्या आहेत.

शासनाने दि २ मे २०१२ नंतर राज्यातील शिक्षक भरतीवर बंदी केल्याने जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती ही मागील तारखेत करण्यात आल्याने शिक्षण विभाग संस्थाकडून युद्ध पातळीवर जमा करीत असलेल्या संचिका ह्या बनावट असल्याचे उघडकीस येणारच आहे. खाजगी संस्थेचा संचमान्यतेत पद नसताना  मेड संचमान्यता नुसार पद करण्यात आल्याचे उघडच आहे शिवाय बिंदू नामावलीस पूर्णपणे तिलांजली देण्यात आलेली आहे.

शिक्षण संस्थेने शिक्षक- शिक्षकेत्तर पद भरतीचे प्राथमिक, माध्यमिक विभागात पाठविलेल्या प्रस्तावाची आवक नोंद शिवाय कनिष्ठ, वरिष्ठ लिपीक अधिक्षक, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांचा टिपण्या सह इतर कागदपत्रे शिक्षण विभागात उपलब्ध नसल्याने शिक्षण संस्थेकडून संचिका जमा करण्याचे काम सुरू आहे. तर या बोगस पद भरतीस तत्कालीन शिक्षणाधिकारी  यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यता यांची नोंद असलेल्या मागील तारखेतील जावक रजिस्टर बेपत्ता असल्याची बाब उघड होत आहे पण बनावट कागदपत्रांचा खेळ पूर्णपणे उघड होण्याची वेळ आली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page