ऊर्जानगरच्या शेडसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; नागरिकांच्या मागणीला मिळाला न्याय
ओम शिव गणेश मंडळ परिसरातील शेड बांधकाम निधीसाठी मिळाली मंजुरी
आ.मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित
*Jyotsna Wankhede*: चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर येथील स्थानिक नागरिकांची गरज आणि परिसराची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओम शिव गणेश मंडळ परिसरातील शासकीय जागेवर शेड बांधकामाच्या मागणीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ऊर्जानगर, समतानगर, नेरी वॉर्ड क्रमांक १ येथील नागरिकांच्या मागणीची दखल घेत आमदार मुनगंटीवार यांनी ६ जून २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे या कामाची शिफारस केली होती. त्यानंतर संबंधित विभागाकडून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि २० सप्टेंबर २०२६ रोजी सदर कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जानगर येथील ओम शिव गणेश मंडळ परिसरातील शासकीय जागेवर शेड बांधकाम करण्याची मागणी प्राधान्याने केली होती. स्थानिक नागरिकांची गरज लक्षात घेऊन या कामाचा प्रस्ताव आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पुढे नेला. आ.मुनगंटीवार यांच्या शिफारशीची दखल घेत संबंधित यंत्रणेने आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे.
चंद्रपूर तालुक्यातील ऊर्जानगर येथील स्थानिक नागरिकांची गरज ओळखून केलेली शिफारस, त्यानंतरचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आता मिळालेली प्रशासकीय मान्यता या प्रक्रियेतून ऊर्जानगरच्या मागणीला विकासकामाचे मूर्त स्वरूप मिळाले आहे. स्थानिक नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या प्रयत्नामुळे ऊर्जानगर परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.