Friday, October 9, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, बल्लारपूर या शाळेला दुसऱ्या पर्यायी प्रवेशद्वाराची केली वंचित...

*आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, बल्लारपूर या शाळेला दुसऱ्या पर्यायी प्रवेशद्वाराची केली वंचित बहुजन आघाडीने मागणी*

*आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, बल्लारपूर या शाळेला दुसऱ्या पर्यायी प्रवेशद्वाराची केली वंचित बहुजन आघाडीने मागणी*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

दिनांक 7/ 10 / 2026 ला “आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, बल्लारपूर या शाळेला दुसऱ्या पर्यायी प्रवेशद्वाराची केली वंचित बहुजन आघाडीने मागणी ” गेली अनेक वर्षापासून शाळा प्रशासनाला या मागणीचा पाठपुरावा करून देखील शाळा प्रशासनाने समाधानकारक उत्तर न देता उडवा उडवीचे उत्तर दिल्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर ने मा. जिल्हा  शिक्षणाधिकारी यांना मा. तहसीलदार बल्लारपूर मार्फत निवेदन देऊन मागणी केली आहे.

 वंचित बल्लारपूर शहरातील आयडियल इंग्लिश मीडियम ही शाळा दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे त्यामुळे त्या शाळेवर विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे व ह्या शाळेला एकच प्रवेशद्वार असल्यामुळे व ते देखील राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या शाळेला इजा करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना पालकांना व शालेय कर्मचाऱ्यांना हायवेच्या विपरीत दिशेने ये जा करतात तसेच जळ वाहनांची वर्दळ मोठ्या संख्येने या रस्त्यावर असल्याने भविष्यात अपघाताची भीती नाकारता येत नाही त्यामुळे अनेक पालकांनी याविषयी शाळा प्रशासनां सोबत मागील तीन-चार वर्षांपासून दुसऱ्या प्रवेशद्वाराची मागणी केलेली आहे परंतु शाळा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या निदर्शनास आले व मागील महिन्यात शाळा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले तरीदेखील शाळा प्रशासनाने या दिशेने काहीही पावलं न उचलल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने मा .जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर विपरीत दिशेला पर्यायी प्रवेशद्वार करण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू यांच्या नेतृत्वात व महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई पागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली याप्रसंगी शहर महासचिव गौतम रामटेके, शहर संघटक राकेश पेटकर, पराग जांभुळकर, प्रकाश रामटेके, आय. टी.प्रमुख प्रियंकेश शिंगाडे, युवा ता.अध्यक्ष अभिलाष चूनारकर, मनोज रघुवंशी,  सुरज शृंगारे, आशाताई भाले, अनिता शंभरकर, संगीता मजगवळी,अनुकला वाघमारे,  सुनील साठे, संदीप ताकसांडे, राकेश निमसटकर, राहुल डांगे, सुमित भाले,संघमित्रा दुर्योधन, श्रावस्ती खोब्रागडे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एका पत्रकाद्वारे शहर महासचिव गौतम रामटेके यांनी दिली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page