Friday, April 17, 2026
HomeEducationमुधोली शाळेत स्नेहमिलन व कृतज्ञता सोहळा संपन्न
spot_img

मुधोली शाळेत स्नेहमिलन व कृतज्ञता सोहळा संपन्न

मुधोली शाळेत स्नेहमिलन व कृतज्ञता सोहळा संपन्न

श्रेयश वानखेडे:

चंद्रपूर जिल्हा माना समाज शिक्षण सहाय्यक मंडळ चंद्रपुर द्वारा  संचालीत, सरस्वती विद्यालय मुधोली व सरस्वती विद्यालय सालोरी च्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी 2024 रोज बुधवारला मुधोली येथे मा. दामोधरजी केदार,सेवानिवृत उपआयुत्त विक्रीकर विभाग म.रा. यांच्या अध्यक्षतेत, उदघाटक मा. संतोषराव थिपे,वनपरिषेञ अधिकारी (बफर) मोहुर्ली व डाॅ. सुधाकरजी हनवते यांच्या उपस्थितीत हा स्नेहमिलन व कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.

पहिल्या सञात मैदानी खेळ कबड्डी,लंगडी, खो खो घेण्यात आले.

दुसर्‍या  सांस्कृतिक सञाचे उदघाटन मा. हनवते  माजी जि.प.उपाध्यक्ष चंद्रपूर व मुधोलीचे सरपंच बंडुजी पाटील नन्नावरे यांच्या उपस्थीतीत संपन्न झाले. या सन्मान सोहळ्यात मा. थिपे यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवुन संस्थेचे संचालक मा. केदार यांनी  सत्कार केला.  थिपे यांनी  विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा इतर शैक्षणिक बाबीकरीता मदत करण्याचे सुतोवाच केले.

च. जि. मा. स. शि. स. मंडळाचे पदाधिकारी आडकुजी गजभे अध्यक्ष, सुरेशराव श्रीरामे सचिव, केशवराव जाभुंळे सदस्य, श्री. तुळशिरामजी श्रीरामे माजी समाजकल्याण सभापती चंद्रपूर, श्री. डोये  ठेकेदार यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.

श्री.  श्रावणजी नन्नावरे उपाध्यक्ष, विश्वनाजी राजनहीरे कोषाध्यक्ष, अजाबराव नन्नावरे सहसचिव, डाॅ.विनोदराव चौधरी, श्री. रविभाऊ काळमेंगे, श्री.  गुणवंतराव दडमल, डाॅ. हनवते कार्याध्यक्ष,  प्रा. रमेशजी वाकडे संचालक , श्री. गोविंदराव सावसाकडे, श्री नरेद्रंजी नन्नावरे यांचा सपत्नीक  शाल श्रीफळ ,साडीचोळी व सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.

तसेच माजी विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.आडकुजी पाटील नन्नावरे आणि स्व. श्रावणजी श्रीरामे सचिव यांचा मरणोत्तर समाजभुषन सन्मानाने गौरवविण्यात आले. श्री. सुरेशजी श्रीरामे संस्था सचिव यांनी श्री. विलास खोंड स.शि. मुधोली यांचा आदर्श  शिक्षक म्हणुन संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवुन गौरव करण्यात आला. शेलवटकर सालोरी L.A.यांचा ही सन्मान करण्यात आला. श्री. केदार संचालक यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने सदैव संस्था पदाधिकारी आपल्या सोबत राहील हे आश्वासन दिले. दोन्ही शाळांनी 100% निकाल दिल्यामुळे सर्व कर्मचारीवृंदाचे अभिनदंन केले. पुढील निकालाकरीता मोठे बक्षिस जाहीर केले. या कार्यक्रमाला दोन्ही शाळेतील सर्व विद्यार्थी,माजी विद्यार्थी, भामडेळी, टेकाडी, सालोरी, कोंढेगाव येथील सरपंच, श्री. दयानंद जांभुळे, मुधोली येथील ग्रामवाशी मोठया संस्खेने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पिजदुरकर  मुख्या. मुधोली, सुञसंचालन श्री. खोंड सर तर आभार श्री शेख सर यांनी मानले.

या कार्यक्रमाला मुधोली व सालोरी मधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page