Wednesday, April 15, 2026
HomeReportingब्रम्हपुरीतील कापड व्यावसायिक कामगारांचा विमा व ईपीएफ भरतच नाही
spot_img

ब्रम्हपुरीतील कापड व्यावसायिक कामगारांचा विमा व ईपीएफ भरतच नाही

ब्रम्हपुरीतील कापड व्यावसायिक कामगारांचा विमा व ईपीएफ भरतच नाही

कामगारांच्या हक्काची रक्कम चोरी करण्याचा हा प्रकार 

श्रेयश वानखेडे:
ब्रह्मपुरी शहरांमध्ये कापडाची मोठी बाजारपेठ आहे. शहरातील कापडाच्या दुकानांमध्ये कापड खरेदी करण्याकरिता ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातून ग्राहक येत असून ग्राहकांची मोठी गर्दी असतो. कापड विक्रीकरिता या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करत आहेत व या कापड दुकानामुळे रोजगार सुद्धा उपलब्ध झाले आहे. काही दुकानांमध्ये २५-३० तर काही दुकानांमध्ये ४० पेक्षा जास्त कामगारांची संख्या असून हे कामगार गेली अनेक वर्षापासून या कापड दुकानांमध्ये अत्यंत कमी पगारामध्ये काम करत आहेत. कामगार दिवसातून १० ते १२ तास काम करतात मात्र या कामगारांना शासनाच्या नियमावलीप्रमाणे कोणत्याही प्रकारचा मोबदला दिल्या जात नसून त्यांचें ईपीएफ सुद्धा भरल्या जात नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
कापड व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात मुनाफा असून या मुनाफ्यातून सदरहू कामगाराचा विमा व ईपीएफ भरायला पाहिजे मात्र या कामगारांची पिळवणूक करत कामगारांना दिल्या जाणाऱ्या हक्काच्या मोबदल्यावर हे कापड व्यावसायिक डल्ला मारत असून कामगारांच्या हक्काची रक्कम चोरी करण्याचा हा प्रकार आहे.
चोरी अनेक प्रकारची असते. काही चोर कुणाच्या घरील साहित्य, पैसा चोरतात, काही शासकीय गौण खनिज चोरतात, काही करामध्ये चोरी करतात तर काही इतर प्रकारे चोरी करतात. मात्र हे कापड व्यावसायिक कामगारांच्या हक्काच्या योजनेवर पाणी घालून त्यांची ईपीएफ व विम्याच्या रक्कमेवर डल्ला मारत असल्याने ही सुद्धा एक चोरी असून अशा कापड व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे.
आर्थिक परिस्थितीने दुर्बळ असल्याने सदरहू कामगार कामावरून काढून घेतील या भीतीपोटी या कापड व्यावसायिक दुकानदारांची संबंधित विभागाकडे तक्रार करत नाही आणि याचाच गैरफायदा हे कापड व्यावसायिक घेत असून यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही कामगारांनी दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page