Thursday, March 12, 2026
HomeEducationबोगस कर्मचारी पगार काढण्याच्या प्रकरणातील तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन...
spot_img

बोगस कर्मचारी पगार काढण्याच्या प्रकरणातील तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक आणि प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर हेच खरे सूत्रधार

बोगस कर्मचारी पगार काढण्याच्या प्रकरणातील तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक आणि प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर हेच खरे सूत्रधार

एरियस बिलातही गोंधळात गोंधळ

 

बोगस मान्यता आणि बोगस आयडीवर पगार काढण्याचे प्रकरणात तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक आणि  प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर हेच खरे सूत्रधार असल्याची चर्चा जोरासोरात रंगू लागली आहे.
 203 कर्मचाऱ्यांचे विविध प्रकरणातील एरियस बिल भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक या कार्यालयाने दिनांक: 23/04/ 2024 रोजी वापस केले आहे. परंतु एका शाळेत समजा तीन कर्मचारी कार्यरत आहे आहे तर दोन कर्मचाऱ्यांचे एरियस बिल चिरीमिरी घेऊन काढण्यात आले आणि एका कर्मचाऱ्यांनी चिरीमरी न दिल्यामुळे वापस केल्याची  चर्चा सुरू आहे.
चिरीमिरी घेऊन मागचे बिल पुढे आणि पुढचे बिल मागे केल्याची चर्चा रंगत आहे. बिलांच्या ऑनलाईन करण्याबाबत  कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन संबंधीत शाळेच्या लिपिकाला किंवा मुख्याध्यापकांना तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक यांनी केले नसल्याचे चर्चिले जात आहे.
सदर गोंधळ हा तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक आणि प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कालावधीत झाला आहे.
गोंधळ आपण करून ठेवला आणि खापर मात्र बदलून गेलेल्या शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यावर फोडण्याचे कार्य सुरू आहे.
” विद्यमान अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, त्या 11 बोगस  कर्मचाऱ्यांचे मे महिन्यापासून वेतन थकीत करण्यात आले आहे. याबाबत प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडून मला पत्र लेखी स्वरूपात प्राप्त झाले आहे.”
” प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, 11  बोगस कर्मचाऱ्यांचे मे महिन्यापासून वेतन बंद करण्याचे बाबत अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक चंद्रपूर यांना कळविण्यात आले आहे.”
परंतु त्यांच्याकडे जेव्हा अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक चंद्रपूरचा  कार्यभार होता त्यावेळी झालेल्या गोंधळाबद्दल विचारले असता,  त्याबाबत त्यांचे म्हणणे असे  आहे की,  ती बाब विद्यमान अधीक्षक यांनाच विचारावे. पुन्हा  ते समोर म्हणतात की,  ” तुम्ही दोन पदभार कसे सांभाळता( शिक्षक आणि पत्रकार), परंतु यांच्याकडे दोन-तीन जागांचा पदभार होता तेव्हा हे कसे काय सांभाळत होते हे प्रश्नचिन्ह उपस्थित झालय?
तेव्हा यांच्या कार्यालयात ” माल सुतो अभियान ” नक्कीच राबवले जात असावे अशी चर्चा सुरू आहे.”
” माजी विधान परिषद नागो गाणार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी विशद केले की, या प्रकरणांमध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या वेतनातून वसुली अपरातफर रक्कमेची वसुली झाली पाहिजे.”
” मान. सुधाकरराव अडबाले विद्यमान शिक्षक आमदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत सांगितले की, दिनांक 4 जून 2024 नंतर याबाबत आपण माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे बैठक बोलावून सविस्तर चर्चा करणार आहे.”

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page