जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिक्षक दिन साजरा

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. भगत, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, सत्कार मूर्ती आर. के. वानखेडे, प्रमुख उपस्थिती यु. के. रांगणकर, एस. एन. लोधे मॅडम, स्वंयशासन मुख्याध्यापक कु. श्रावणी मत्ते यांची होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थिनी कु. रूपाली निमकर, कु. अनुष्का दुर्गे, अथर्व हीकरे, श्रावणी मत्ते यांनी डॉ. राधाकृष्णन
यांच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.
शाळेचे शिक्षक श्री. रांगणकर सर यांनी सांगितले की, स्वंयशासनामध्ये भाग घेणारे विद्यार्थी अभिनंदनासाठी पात्र आहे.
याबाबत एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक आर के वानखेडे यांना शिक्षण रत्न आणि रबींद्र रत्न पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आपले अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिखरावर जाऊन बसण्यास मदत करतात. ते उद्याचे उगवणारे सूर्य आहे आणि समाजाला प्रकाशमान करण्याचं काम हे शिक्षकच करू शकतात. हातातील ध्येय पूर्णत्वास नेणे हे शिक्षकाचे कार्य आहे.
याआधी शाळेतील विद्यार्थ्यांनी शासनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. मुख्याध्यापकांची, शिक्षकांची व शिपायाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. बी. अलाम, संचालन व आभार प्रदर्शन कु. त्रिशाली महानंद हिने केले.
कार्यक्रमात शिक्षक एस. एम. चव्हाण व शिक्षकेतर कर्मचारी गणेश चंदावार, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थी उपस्थित होते.