Tuesday, January 20, 2026
HomeSpardhaनागपूर येथे राज्यस्तरीय प्रौढ जलतरण स्पर्धेचे आयोजन
spot_img

नागपूर येथे राज्यस्तरीय प्रौढ जलतरण स्पर्धेचे आयोजन

नागपूर येथे राज्यस्तरीय प्रौढ जलतरण स्पर्धेचे आयोजन

श्रेयश वानखेडे:

महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वेटिक असोसिएशन , नागपूर डिस्ट्रिक्ट वेटरन्स स्विमिंग असोसिएशन आणि हनुमान स्पोर्टस अकॅडमी  यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे दिनांक २१ व २२ सप्टेंबर २०२४४ रोजी राज्यस्तरीय प्रौढ जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही २५ वी राज्यस्तरीय स्पर्धा रौप्य महोत्सव म्हणून संपन्न  होत आहे .सदर स्पर्धा ही  नागपूर सुधार प्रन्यास (एन आय टी) उत्तर अंबाझरी मार्ग जलतरण केंद्रावर संपन्न होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता राज्यभरातून  ५०० जलतरणपटू सहभागी होणार आहे. सदर स्पर्धा ही स्त्री आणि पुरुष यामध्ये विविध गटांमध्ये होणार आहे २५-२९, ३०-३४, ३५ -३९ ,४०-, ४४, ४५-४९ , ५० ,५४,५५ -५९ ,६० – ६४, ६५- ६९, ७०- ७४, ७५ – ७९ आणि ८० वर्षाच्या वर या जलतरण स्पर्धेत मध्ये फ्रीस्टाइल ५०मी., १०० मी.,२०० मी. आणि ४०० मिटर. ,बेस्ट स्ट्रोक ५०मी आणि १०० मिटर., बॅकस्ट्रोक  ५० मी १००मी  मिटर., बटरफ्लाय स्ट्रोक ५० मी  व  १०० मिटर तसेच २०० मिटर वैयक्तिक मिडले आणि २००  मिटर फ्रीस्टाइल रिले आणि२०० मिटर मिडले रिले चा यात समावेश करण्यात आलेला आहे. रिले सोडून एका खेळाडूला चार इव्हेंट मध्ये सहभागी होत जाईल.
या स्पर्धेकरिता रजिस्ट्रेशन शुल्क ५०० रुपये आणि इव्हेंट शुल्क २०० रुपये असे ठेवण्यात आले आहे . सर्व खेळाडूंची भोजनाची व निवासाची व्यवस्था निशुल्क करण्यात आलेली आहे .खेळाडूंची निवास व्यवस्था आमदार निवास येथे करण्यात आलेली आहे.
फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२४ आहे. ज्या स्पर्धकांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी स्पर्धा संयोजक संजय बाटवे ९३७३४७९८९१, तर जलतरण प्रशिक्षक अनिल पांडे ९६५७०१७१००आणि जलतरण प्रशिक्षक स्वप्निल पावडे ९९२१२२६२२१ यांच्याशी सकाळी ७:००ते १०:०० एनआयटी पूलवर संपर्क करावाऑनलाइन रजिस्ट्रेशन करिता वेबसाईट msvaa.in  वर फॉर्म भरावे असे संघटनेचे अध्यक्ष अमित सावजी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page