Wednesday, August 26, 2026
spot_img
HomeEducationमहात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक व इतिहास विभागातर्फे " शिक्षक दिन "...

महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक व इतिहास विभागातर्फे ” शिक्षक दिन ” साजरा

महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक  व इतिहास विभागातर्फे

” शिक्षक दिन ” साजरा

श्रेयश वानखेडे:-
 5 सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो या दिनी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. या दिनाचे औचित्य साधून बल्लारपूरातील स्थानिक महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतीक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. किशोर चौरे यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले  होते. याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी  डॉ. विनय कवाडे, डॉ.  डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. रजत मंडल, प्रा.स्वप्नील बोबडे, प्रा.सतिश कर्णासे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. योगेश टेकाडे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page