तालुका ॲथलेटिक्स स्पर्धेत के.जी.एन. शाळा प्रथम, विद्यार्थ्यांनी पटकावले एकूण 25 पदक.

Shreyash Wankhede: महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत तालुका क्रीडा अधिकारी बल्लारपूर यांच्या विद्यमाने दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी तालुका क्रीडा स्टेडियम ,विसापूर येथे ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानी स्पर्धेत बल्लारपूर येथील के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत विविध गटामध्ये एकूण 25 पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटामध्ये मोहम्मद मिराज याने 100 मीटर बाधा धाव व उंच उडी प्रथम क्रमांक
तर लांब उडी दुसरा क्रमांक पटकावला तसेच आर्यन तिवारी याने उंच उडी प्रथम क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील वयोगटांमध्ये वंश झिलकलवार ने उंच उडी ,500 मीटर पैदल चाल व 110 मीटर बाधा धाव यात प्रथम क्रमांक पटकावला. सुजल हिरण याने सहा किलोमीटर धावणे प्रथम क्रमांक तर 800 मीटर धावणे या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला तसेच कृष्णा मांझी यांनी उंच उडी मध्ये दुसरा क्रमांक पटकावला.
19 वर्षाखालील वयोगटांमध्ये धम्मशील साव याने पाच किलोमीटर पैदल चाल तथा ११० मीटर बाधा धाव
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला . मोहम्मद मुर्रसलीन याने थालीफेक प्रथम क्रमांक व भालाफेक स्पर्धेत दुसरा
क्रमांक पटकावला. रेहान खान याने 110 मीटर बाधा दौड दुसरा क्रमांक. फरीद शेख याने थालीफेक स्पर्धेत
प्रथम क्रमांक पटकावला.
19 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये तमन्ना शेख हिने 110 मीटर बाधा धाव मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या
सर्व खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. शाळेचे क्रीडा प्रशिक्षक रमेश नातरगी सर
यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. शाळेचे संस्थापक शेख महेमूद, प्रिन्सिपल सुजाता करमरकर, वाइस
प्रिन्सिपल सीमा माकडे, प्रशासक झीनत खान,तौसीफ अहेमद, श्वेता डोनेवार ,रिंकू चव्हाण, सरला वेलपुरी, कौसर सय्यद आदी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या सत्कार केला.









