Saturday, May 2, 2026
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर  येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 12.02.2025 रोजी एका कार्यक्रमाद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, यु. के. रांगणकर, आर. बी. अलाम  यांची मंचावर उपस्थित होती.
प्रथमत: मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलेत. शाळेचे दहावीचे विद्यार्थी कु. श्रावणी मत्ते, लोकेश घोडेस्वार, नमो खंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यु. के. रांगणकर, आर. बी. अलाम, एम. डी. टोंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक व संचालन आर. के. वानखेडे व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.निरोप समारंभ कार्यक्रमात  चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, वामन बोबडे, इंद्रभान अडबाले, सुंदराबाई वैद्य, वर्षा ठाकरे सहित विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शेवटी नाश्ता वाटप करण्यात आला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page