दि.१६ फेब्रुवारी ला कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलित करुन माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे अध्यक्ष विलास खोंड (ग्रामीण), विशेष उपस्थितीत राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, राज्य कार्याध्यक्ष(प्राथ.) प्रकाश चुनारकर, नागपूर विभाग अध्यक्ष अजय वानखेडे, विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे, सुधिर वारकर विभाग कार्यालयीन मंत्री, विभाग उपाध्यक्ष विनोद पांढरे, मधुकर मुप्पीडवार, विभाग संघटनमंत्री रामदास गिरटकर, विभाग कार्यवाह(प्राथ.) विलास बोबडे, हेमंत भिंगारदेवे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती राजूरा, जिल्हा कार्यवाह दिलीप मॅकलवार, जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्या गिरडकर, विवेक आंबेकर, देवेंद्र कंचर्लावार, सरिता सोनकुसरे, अमोल देठे जिल्हाधक्ष (जि.प.) आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दोन दिवसीय जिल्हा अधिवेशनात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न, समस्यांवर चर्चा करण्यात करण्यात आली. तक्रार निवारण सत्रात मधुकर मुप्पीडवार यांनी आलेल्या तक्रारीचे निवारण केले. “कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण” यात मराशिपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ गरफडे माजी जिल्हाध्यक्ष यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. जुनी पेंशन बाबत माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी ‘रजा नियम’ याविषयी रामदास गिरटकर यांनी माहिती दिली तर ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ यावर पुजाताई चौधरी राज्य महिला आघाडी प्रमुख यांनी माहिती दिली. तसेच दुसऱ्या दिवशी दिलीप मॅकलवार यांनी अहवाल वाचन केले. तदनंतर विनोद पांढरे विभाग उपाध्यक्ष यांनी संघटनेच्या कार्याची माहिती व कार्यकर्ता कसा असावा याविषयी विचार व्यक्त केले. सुधिर वारकर, पुजाताई चौधरी यांनी मार्गदर्शन केले. माजी आमदार नागो गाणार यांनी विविध विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. यामध्ये सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करणे, घोषित, अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शाळा व तुकड्या तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान देणे, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण देणे, चतुर्थ श्रेणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पद पूर्ववत करणे, अर्धवेळ ग्र्ंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपालाचा दर्जा देणे, बीएलओ, जनगणना, व इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न देणे, वरिष्ठ व निवड श्रेणी विना अट सरसकट देणे, एम.ई.पी.एस. नुसार कॅान्व्हेंट शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळणे या विषयावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास खोंड (जिल्हाध्यक्ष ग्रामीण) यांनी वर्षभरात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी, प्रश्न कशारितीने सोडविले याचा पाढा वाचला. अनेक समस्यांचा सामोरे जावे लागते, परंतू माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश पातळे हे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्परतेने कार्य करणारे अधिकारी चंद्रपूर जिल्हा परिषदेला लाभल्याचे समाधान व्यक्त केले. य अधिवेशनाचे नियोजित उद्घाटक आमदार देवराव भोंगळे हे इतर कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते काही वेळानी कार्यक्रमाला भेट देवून शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आमदार वामनराव चटप यांनी सुद्धा अधिवेशनस्थळी येऊन प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संघटनेत कार्य केलेल्या सेवानिवृत्त झालेल्या कार्यकर्त्यांचा गाणार सर इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व शिल्ड देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यामध्ये सुनिल पाचखेडे सर, विवेक आंबेकर, हरिश्चंद्र पाल, हरिभाऊ गरफडे, वासुदेवराव खाडे,अविनाश पिपंळशेंडे,रणदिवे सर,गायकवाड सर,विकास नदुंरकर सर,दुधे सर व इतर कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सौ.मंगला डांगरे व आभार राजुरा कार्यवाह दयानंद चिंतलवार सरांनी मानले.