जनता विद्यालयाचा विद्यार्थी नैतिक बहुरिया बल्लारपूर तालुक्यातून प्रथम
श्रेयश वानखेडे:
जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी नैतिक बहुरिया याने एसएससी परीक्षा 2024 मध्ये 89% प्राप्त करून एस. सी. कॅटेगरी मध्ये बल्लारपूर तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
नैतिक बहुरिया ला महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत, समाज कल्याण विभाग चंद्रपुर द्वारे देण्यात येणारी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती 5000 रुपये प्राप्त झाली आहे.
चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रतिभाताई अशोकराव जीवतोडे, सचिव डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे, उपाध्यक्ष अंबर अशोकराव जीवतोडे यांनी बल्लारपूर तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नैतिकचे अभिनंदन केले.
शाळेचे मुख्याध्यापक बी. के. लांडे, पर्यवेक्षक आर. आर. निखाडे, पाळी प्रमुख डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते, ज्येष्ठ शिक्षिका डी. एम. मीनमुले, पी आर. सातपुते, वर्गशिक्षक पी. एम. उरकुंडे तसेच शिक्षक वृंद यांनी नैतिकचे अभिनंदन केले आहे.