विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्यासोबत नागपूर विभागातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा
Jyotsna Wankhede:
विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्यासोबत नागपूर विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा १९ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात पार पडली. यावेळी २ प्रकरणांना ऑन द स्पाॅट मान्यता देण्यात आली.
यावेळी प्रलंबित शालार्थ आयडी, शिक्षकेत्तर कर्मचारी शालार्थ आयडी व अनेक इतर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित शालार्थ आयडी प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर सौ. सावरकर मॅडम यांना दिल्या. शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शालार्थ आयडी मिळण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी श्री. दिलीप कडू, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर जिल्हा कार्यवाह संजय वारकर, महानगर कार्यवाह अविनाश बडे, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, वर्धा जिल्हाध्यक्ष विष्णू इटनकर, जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, चंद्रपूर जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, सौ. बोपचे, शकील सर, दिनेश वाघ, श्री. गलांडे आदींची उपस्थिती होती.