Tuesday, May 5, 2026
HomeEducationहायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना, मुख्याध्यापक पदासाठी टीईटी आवश्यकता ? अनिल...
spot_img

हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना, मुख्याध्यापक पदासाठी टीईटी आवश्यकता ? अनिल दहिफळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर

हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना, मुख्याध्यापक पदासाठी  टीईटी आवश्यकता ? अनिल दहिफळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर 

 ज्योत्स्ना वानखेडे:
                खाजगी शाळा शिक्षक संघाने दिनांक ९ फेब्रुवारी ला अनिल दहिफळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर यांची भेट व स्वागत केले.
      मुख्याध्यापक मान्यतेसाठी  चर्चा केली असता, मुख्याध्यापक इयत्ता नववी व दहावी वर्गावर तसेच कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक नियुक्त असले तरीही ते टीईटी उत्तीर्ण आहे किंवा नाही हे मुख्याध्यापक म्हणून मान्यता प्रदान करतांना तपासवे लागेल हा मुद्दा अनिल दहिफळे, यांच्या द्वारे उपस्थित करण्यात आला.
          टीईटी परीक्षा  उत्तीर्ण पात्रता ही इयत्ता पहिली ते आठवी वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकांकरिता आहे,शालेय शिक्षण विभाग, पत्र दिनांक १९ जानेवारी २०२६ हे इयता पहीली ते आठवी नियुक्त शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती बाबत आहे, इयत्ता नववी व दहावी तसेच अकरावी व बारावी नियुक्त शिक्षकांबद्दल नाही हे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
       शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर यांच्या चुकीच्या भुमिकेस शिक्षण विभागाने मान्यता दिल्यास शिक्षण विभागात गोंधळाची स्थिती निर्माण होईल, अनेक माध्यमिक शाळा मुख्याध्यापकाशिवाय असतील, नागपुर माध्यमिक विभागातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर,वर्धा, गोंदिया व गडचिरोली, माहे जानेवारी, फेब्रुवारी व त्यामागील महीण्यातील मुख्याध्यापक मान्यता १४० ते १५० प्रलंबित आहेत.
 माध्यमिक विभागात नियुक्त  व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण  मुद्दा मुख्याध्यापक मान्यता प्रदान करतांना लावल्यास गोंधळ निर्माण होतो स्पष्ट करण्यात आले होते याबाबत खाजगी शाळा शिक्षक संघानी आयुक्त (शिक्षण), शरद माकणे,अवर सचिव,आ. निरंजन डावखरे, आ. संदीप जोशी,शिक्षण संचालक माध्यमिक, शिक्षण उपसंचालक नागपूर यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
       शिक्षणाधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सर्वश्री प्रमोद रेवतकर, विजय नंदनवनात, पुरूषोत्तम कामडी, अतुल भुरे,पवन नेटे, लोकपाल चापले, ज्ञानेश्वर डायगव्हाने व अनुकंपा धारक आदीत्य कामडे,मारोती मोरे इत्यादी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page