Sunday, August 9, 2026
spot_img
HomeRajura*राजुरा ठाणे येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कार्यवाही;दोन गुन्हे उघड*

*राजुरा ठाणे येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कार्यवाही;दोन गुन्हे उघड*

*राजुरा ठाणे येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कार्यवाही;दोन गुन्हे उघड*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन राजुरा येथे दिनांक 29/06/2026 रोजी, फिर्यादी नामे व्यंकटेश किष्टय्या नरमवार वय 32 वर्षे, व्यवसाय नोकरी, रा म.रा.वि.वि.कं म राजुरा ता राजुरा जि.चंद्रपूर मो.क्र 7875113617 यांनी तक्रार दिली की, आमच्या कार्यक्षेत्रातील 11 के.व्ही सास्ती फिडर वरील काही विद्युत खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता.
सदर लाईन डब्लु सि एल च्या चेक पोस्टच्या पुढील क्षेत्रात असल्यामुळे त्याच दिवशी डब्लु सि एल च्या चेक पोस्ट वरिल सुरक्षा कर्मचा- यांना लाईन पडल्याची व त्या परिसरातील वीज लाईन बंद अवस्थेत असल्याची माहिती देण्यात आली होती.
सदरचे त्याच कालवधीत महावितरणचे कंत्राटदार संपावर असल्यामुळे सदर लाईनची दुरुस्ती तात्काळ करता आली नाही. तेव्हा तेथील बंद पडलेले साहित्य
01) एल्युमिनिअम तार 100 एस क्यु एमएम जुनी ऑल्युमिनिअम तार 3450 मिटर 1,48,000/- रू
02) ऑल्युमिनिअम तार 55. एस क्यु एम एम जुनी वापरती ऑल्युमिनिअम 1350 मिटर अ.कि 24,300/- रू
03) अग्नी प्रतिरोधक एच पाईट चॅनल 03 नग कि 27000/- रु
असा एकुण 1,99,300/-रु चा माल कोणतरी अज्ञात चोराने ऑल्युमिनिअम तार चोरुन नेले आहे. अशा फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता, मा.पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांचे नेतृत्वाखाली डि .बी इंचार्ज सपोनी लक्ष्मण लोकेरे व सोबत डी.बी स्टॉप यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना गोपनीय बातमीदार कडुन मिळालेल्या माहितीवरुन खालील नमुद आरोपी यास ताब्यात घेवुन अटक केली व त्यांच्याकडुन गुन्हयात दाखल असलेल्या ऑल्युमिनिअम तार खालीलप्रमाणे जप्त केले आहे.
*पोलीस स्टेशन अप क्र 661/2026 कलम 303(2) भा.न्या.सं*
*577/2026 कलम 303 (2) भा न्या .सं*
*आरोपीचे नाव:-*
01) *रंजित ऊर्फ बल्ला शिवपुजन निषाद* वय 26 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. सरदार पटेल वार्ड बल्लारशाह ता बल्लारशाह जि चंद्रपूर
02) *मुन्ना ऊर्फ लंगडा सतोष रामकुपाल निषाद* वय 32 वर्षे, रा. भगतसिंग वार्ड बल्लारशाह ता बल्लारशाह जि चंद्रपूर
*जप्त ऑल्युमिनिअम तार व केबल चे वर्णन*
01) एल्युमिनिअम तार 100 एस क्यु एमएम जुनी ऑल्युमिनिअम तार 3450 मिटर 1,48,000/- रू
02) ऑल्युमिनिअम तार 55. एस क्यु एम एम जुनी वापरती ऑल्युमिनिअम 1350 मिटर अ.कि 24,300/- रू असा एकुण 1,72,300/- रु
03) केबल तार 115 फुट केबल तार अ कि 6000/- रु
*असा एकुण 1,78,300/-रु*
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपानी सा चंद्रपूर ,मा.अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सा. चंद्रपूर मा.उप विभागिय पोलीस अधिकारी श्री.सुधीर नंदनवार सा राजुरा यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक नितिन चिंचोळकर, यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे ,सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ शफीक शेख, महेश बोलगोडवार, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, यांनी केली आहे .
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page