मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत निबंध व चित्रकला स्पर्धा

श्रेयश वानखेडे:
दिनांक: 14/02/2025 ला मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे 100 दिवसीय टी. बी. (क्षयरोग) मुक्त भारत अभियान अंतर्गत निबंध व चित्रकला स्पर्धा तसेच टी. बी. या रोगाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्य मा.आसमा खान खलीदि मॅडम, मार्गदर्शक वक्ते स्वाती गोलपेलवार मॅडम, विपीन झाडे सर, माधुरी भुरे मॅडम हे आरोग्य विभाग टी.बी. (क्षयरोग) या विभागातून उपस्थित होते.








