चांदा इको केअर फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण
श्रेयश वानखेडे:
चांदा इको केअर फाउंडेशन चंद्रपूर तर्फे 13 जुलै 2025 ला हड्सती ग्रामपंचायत जगन्नाथ बाबा मठ परिसर व भवानी माता मंदिर परिसर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हडस्ती ग्रामपंचायत सरपंच सौ अंजलीताई पारखी, माजी सरपंच मुरलीधर गौरकार प्रामुख्याने उपस्थित होते.
हड्सती ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करून हड्सती परिसर सुशोभित करणे व पर्यावरण वाढविणे हा संस्थेचा हेतू आहे.
हड्सती ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत व्हावी याकरता सुद्धा तिथे स्वच्छता अभियान, तंटामुक्ती, साक्षरता अभियान व पर्यावरण पूरक कार्यक्रम राबविण्याचा चांदा इको केअर फाउंडेशन संस्थेचा मनोदय असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक आंबेकर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले.
संस्थेचे सचिव पद्माकर मोरे यांनी कार्यक्रमाचे संचालन करताना संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली व हड्सती वासियांचे आभार मानले .
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अशोक दुर्गे, सहसचिव अविनाश रेशीमवाले, कोषाध्यक्ष प्रमोद केळझरकर, सहकोषाध्यक्ष अतुल अल्याडवार, सदस्य अतुल देवताळे, आनंद निरंजने, नितीन फुलझले, प्रदीप देवइकर ,संजय रागनकर , सतीश पेठे, अरविंद बनकर तथा हड्सती येथील सन्माननीय नागरिक उपस्थित होते.