Saturday, May 2, 2026
HomeEducationजनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांना गणित दिनी मिळाले करिअर...
spot_img

जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांना गणित दिनी मिळाले करिअर मार्गदर्शन.

जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांना गणित दिनी  मिळाले करिअर मार्गदर्शन.

Jyotsna Wankhede:
जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथे श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर च्या सौजन्याने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले.
     यावेळी व्यापीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका एन. एच. हेलवटे विराजमान होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शर्मिला कार्लेकर, डॉ. सायली माढा, डॉ. प्रमेय भगत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, जेष्ठ शिक्षिका पी. जे. गंगमवार, गणेश तुप्पेकर वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार तथा दीप प्रज्वलन करून झाली.
     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शर्मिला कार्लेकर यांनी आपल्या मनोगतातून आपल्या दैनंदिन जीवनात आपला संबंध नेहमी गणिताशी येत असतो हे सांगून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या विविध वाटा कोणत्या याविषयी मार्गदर्शन केले.
     डॉ. सायली माढा तथा गणेश तुप्पेकर यांनी  दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक असते. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना अपेक्षेएवढे गुण मिळतातच असे नाही. कमी गुण मिळूनही करिअरच्या विविध वाटा कोणत्या, एखादे क्षेत्र निवडताना त्याबद्दलची माहिती कशी मिळवावी याचे संपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या ‘उज्वल भविष्यासाठी’ या  गणित दिनी केले.
     अध्यक्षीय मनोगतात शाळेच्या मुख्याध्यापिका  एन. एच हेलवटे यांनी गणित हा विषय प्रत्येक क्षेत्रासाठी आवश्यक आहे. गणिताची आवड विद्यार्थ्यांनी निर्माण करावी असे सांगितले.
      गणित दिनानिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोस्टर स्पर्धा व गणितीय प्रतिमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
        यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच गणित संबोध परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते यांनी केले.
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page