बल्लारपूर पोलिसांची कारवाई, अग्निशस्त्रासहित 5 युवक ताब्यात, गुन्हा दाखल
ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक- 18/04/2026 रोजी पोलीस स्टेशन बल्लारपूर चे डीबी स्टाफचे टीम यांना दोन इसम हातात हत्यार घेवून किल्ला वार्ड, बल्लारपूर भागात फिरत असल्याचे मुखबीरद्वारे खात्रीशीर माहिती मिळालेवरुन पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांचे आदेशाने डीबी स्टाफ पेट्रोलींग करीत असतांना सायंकाळी 7/00 वाजताच्या दरम्यान आरोपी नामे- गौरव सुनिल कुकुडकर व बालाजी उर्फ कार्तीक शिवा मोहूर्ले दोन्ही राहणार किल्ला वार्ड या दोन इसमास ताब्यात घेतले, त्यांचेजवळ एक लोखंडी फायटर व चाकू मिळून आला ते जप्त करून त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केले असता विष्णू वलसा व अनुराग मातंगी यांना अग्निशस्त्र विक्री केल्याबाबत सांगीतले. त्यावरुन डीबी स्टाफने विष्णू यास ताब्यात घेवून व अनुराग मातंगी यांचे राहत्या घरात जावून झडती घेतले असता त्याचे घरी देशी बनावटीचे सिंगल बॅरेल 7.65 एम.एम. बोअर असलेले एक माउजर अग्निशस्त्र किंमत 45,000/- रूपये व 4 जिवंत काडतूस 10,000/- अवैधरीत्या व विनापरवाना दहशत माजविण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगून असतांना मिळून आला तरी त्यास ताब्यात घेवून अग्निशस्त्र व काडतूस, दुचाकी असे एकूण 1,05,100/- रुपयाचे मुद्देमाल दोन पंचासमक्ष पंचणामा करून जप्त करण्यात आले असून गौरव सुनिल कुकुडकर, बालाजी उर्फ कार्तीक शिवा मोहूर्ले दोन्ही रा. किल्ला वार्ड बल्लारपूर, विष्णू भास्कर वलसा, रेल्वे वार्ड, अनुराग आनंदराव मातंगी, रा. श्रीराम वार्ड, विराज आगदारी, किल्ला वार्ड, बल्लारपूर यांचे विरुध्द पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अप क्र. 466/2026 कलम 3, 25, 7, 27 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. तरी सदर अग्निशस्त्र कोठून आणले व उद्देश काय होता याबाबत अधिकचा तपास पोलीसांद्वारे करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन सा, अप्पर पोलीस अधिक्षक इश्वर कातकडे सा, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव सा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे सा यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि अभिषेक जंगमवार, उमेश जोगदंड, पोहवा. संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, प्रविण निकोडे, मोहन निषाद, पंकज शिंदे, विकास जुमनाके, सचिन अल्लेवार, पोअं. लखन चव्हाण, खंडेराव माने, गुरू शिंदे, वैभव गाडगे, शरद कारुश, अनिता नायडू, यांनी केली.