*हडस हायस्कूलच्या छात्र सैनिकांचे वार्षिक शिबिरात दैदिप्यमान यश* *एकता व अनुशासन याचे दर्शन*

*ज्योत्स्ना वानखेडे*
शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेचा आदर्श जपणाऱ्या *२ महाराष्ट्र सिग्नल कंपनी एनसीसी, तुकडी ३६/ए* अंतर्गत *हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांनी संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर CATC-६०७* मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
सावनेर तालुक्यातील हेटी सुरला येथे *२ महाराष्ट्र सिग्नल कंपनी एनसीसी, नागपूर* यांच्या वतीने दहा दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात नागपूरातील विविध शाळा-महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. हडस हायस्कूलमधून १४ मुल आणि ०३ मुली असे एकूण १७ छात्रसैनिक या शिबिरात सहभागी झाले होते.
शिबिरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये हडस हायस्कूल च्या कॅडेट्सनी लक्षणीय यश मिळवले.
*कॅडेट रिया सूर्यवंशी* हिने दोरखंड झुंज स्पर्धेत सुवर्णपदक आणि म्युझिकल चेअरमध्ये रौप्यपदक पटकावले. *कॅडेट रिदम मेश्राम* हिने एकल पारंपरिक नृत्यात सुवर्णपदक मिळवत शाळेचा सांस्कृतिक वारसा जपला, तसेच ड्रिल सादरीकरण सुवर्ण, रायफल शूटिंगमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. *कॅडेट केदार व्यवहारे* याने क्रिकेटमध्ये कांस्यपदक जिंकले असून सांस्कृतिक कार्यक्रमात अप्रतिम तबला वादनाने उपस्थितांची दाद मिळवली. *कॅडेट अर्पिता सिंग* हिने दोरखंड झुंजमध्ये कांस्यपदक तर *कॅडेट सोहाम मसराम* याने व्हॉलीबॉलमध्ये रौप्यपदक, *कॅडेट एकांश राऊत व कॅडेट ईशांत भोयर* क्रिकेट या खेळात कस्य पदकांचा मानकरी ठरला.
या यशाचे श्रेय *कमांडिंग ऑफिसर लेफ्ट. कर्नल महिधर धरनी यांच्या मार्गदर्शनासह, प्राचार्य श्री. अजय लाबडे, मुख्याध्यापिका सौ. मृणाल कासखेडीकर, पर्यवेक्षक डॉ. पी.एस. देशपांडे* आणि *असोसिएट एनसीसी ऑफिसर चीफ ऑफिसर डॉ. सुशील एस. वंजारी* यांच्या अथक प्रयत्नांना जाते, असे शाळेतर्फे सांगण्यात आले.
उत्कृष्ट शिस्त आणि सांघिक भावनेसाठी अल्फा कंपनी ला स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कंपनीचे नेतृत्व *चीफ ऑफिसर डॉ. सुशील एस. वंजारी* *सीटीओ बाळासाहेब लाड* आणि *हवालदार पांडे* यांनी केले. शिबिरातील सर्व सहभागी कॅडेट्सना कौतुकपत्र प्रदान करण्यात आले.
*एकता आणि अनुशासन*’ या ब्रीदवाक्याला साजेसे वर्तन ठेवून हडस हायस्कूलच्या कॅडेट्सनी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. लिबरल एज्युकेशन सोसायटीचे *अध्यक्ष डॉक्टर ए.पी. जोशी, सचिव निलेश साठे, कोषाध्यक्ष विनय लाडकर* यांच्या वतीने सर्व विजेत्या कॅडेट्सचे अभिनंदन करण्यात आले आहे.









