Tuesday, July 28, 2026
HomePolice*रामनगर पोलिसांचे ट्रव्हल्सवर धाडसत्र*
spot_img

*रामनगर पोलिसांचे ट्रव्हल्सवर धाडसत्र*

*रामनगर पोलिसांचे ट्रव्हल्सवर धाडसत्र*

*ज्योत्स्ना वानखेडे*

पोलीस ठाणे रामनगर अंतर्गत *दि. 25/07/2026 रोजी* पोलीस निरीक्षक *प्रभावती एकुरके मॅडम* यांना गोपनिय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की,  *नागपूर ते हैद्राबाद* चालणारी *D.N.R. ट्रव्हल्स* मध्ये अंमली पदार्थांची वाहतुक होत आहे.

अशी खबर मिळाल्याने सदर मिळालेली माहिती मा. वरिष्ठांना देऊन त्यांचेकडून कार्यवाही संबंधाने परवानगी प्राप्त झाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक *प्रभावती एकुरके मॅडम* यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि *हनुमान उगले* सोबत पो.स्टाफ, पंच, फोटोग्राफर व अंमली पदार्थांची ओळख पटविणारे *दोन श्वान* यांचेसह रवाना होऊन,बातमीतील ट्रव्हल्स *चंद्रपूर येथे* येताच तिची कायदेशीर प्रक्रिया व परवानग्या पूर्ण करून पंच समक्ष श्वानांचे मदतीने झडती घेण्यात आली.

परंतु वाहनात बातमीतील हकीकतीप्रमाणे संशयीत माल मिळून आलेला नाही. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

*पोलिसांचे आवाहन:*

रामनगर पोलीसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे की, यापुढे अवैध प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थ व अंमली पदार्थ यांची वाहतुक करणाऱ्या आंतरजिल्हा व आंतरराज्य चालणाऱ्या ट्रव्हल्स ची माहिती घेऊन कार्यवाही करण्याची तयारी ठेवली आहे.

तरी ज्यांना याबाबत माहिती आहे किंवा माहिती मिळाल्यास *रामनगर पोलिसांशी संपर्क* करावा.

*ही कारवाई कोणी केली?*

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक *श्री. आयुष नोपानी* सा.,

मा. अपर पोलीस अधीक्षक *श्री. ईश्वर कातकडे* सा.,

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी *श्री. प्रमोद चौगुले* सा. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली

मा. पोलीस निरीक्षक *प्रभावती एकुरके मॅडम* यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि *शिवाजी नागवे*, सपोनि *हनुमान उगले*, पोउपनि *कृष्णा दराडे* तसेच सफौ *प्रकाश बलबी/618*, पोहवा *आनंद खरात/1165*, पोहवा *बाबा नैताम/2253*, पोहवा *रामप्रसाद नैताम/1306*, पोहवा/जितेंद्र आकरे *566*, पोहवा *रवि ढेंगळे/847*, मपोहवा *मनिषा मोरे/462*, पोअं. *प्रकाश मडावी/2708*, पोअं. *पंकज ठोंबरे/1230*, पोअं. *संदीप गेडाम/1304*, पोअं. *सुरेश कोरवार/2291*, पोअं *पंकज पोंदे/734*, मपोशि *ब्ल्यूटी साखरे/2653* यांनी केलेली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page