Thursday, September 17, 2026
spot_img
HomeEducation*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे हिंदी दिवस उत्साहात...

*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*

*मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे हिंदी दिवस विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या असमा खान मॅडम होत्या. यावेळी पर्यवेक्षिका सुनिता कांबळे मॅडम, प्रा. भाग्यश्री आमटे मॅडम, प्रा. शैलेजा मासर्ला मॅडम, तसेच रीता वानखेडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर प्राचार्या असमा खान मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना दैनंदिन व्यवहारामध्ये हिंदी भाषेचे महत्त्व तसेच हिंदी भाषेचा समृद्ध वारसा याविषयी माहिती दिली.
हिंदी दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हिंदी भाषेवरील नृत्य, भाषण, कहानी, पहेलियाँ, मुहावरे आणि प्रश्नमंजुषा यांचा समावेश होता. या विविध उपक्रमांमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना परवीन आसिफ शेख व अमृता निषाद या विद्यार्थिनींनी केले, तर पिहू सूर्यवंशी हिने आभार प्रदर्शन केले.
हिंदी भाषेविषयी विद्यार्थिनींमध्ये आवड, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page